कोल्हापूर: आपण आजपर्यंत बैल, गाय, म्हैस, घोडा यांची किंमत लाखात मोजलेली ऐकली किंवा बघितली असेल, पण एका शेळीची (goat) किंमत १ लाख ५१ हजार रुपये हे ऐकून नवलच वाटणार आहे. होय, पण हे खरे आहे. ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट आहे का? एका जिद्दी सुशिक्षित दाटे ता. चंदगड (chandgad) येथील तरुणाची आहे. ४ वर्षांपूर्वी दाटे येथील ज्ञानेश्वर गावडे या तरुणाने कर्ज काढून पत्नी ज्ञानेश्वरी हिच्या बरोबर सुरू केलेला आफ्रिकन (African) शेळीपालनाचा व्यवसाय आज लाखोची उलाढाल करत आहे. (africa goat farming in kolhapur chandgad taluka price)
हे देखील पहा-
सुरुवातीच्या काळात सगळ्यांनीच नावे ठेवली होती. पण खचून न जाता संयम, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असली की यश हमखास मिळत असतं. हे त्याने आजच्या झटपट पैसे मिळवण्याच्या नादात स्वतः चे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या तरुणांना एक आदर्श घालून दिला आहे. ज्ञानेश्वर या जिद्दी तरुणाने वातावरणामधील (atmosphere) बदलाचे आव्हान स्वीकारून आफ्रिकन वंशावळीची एक शेळी आणि एक बोकड पाळण्याकरिता आणले होते. त्यांची वंशावळ वाढवून त्यातील एक गाभण शेळी ''लाख ''मोलात विकल्यामुळे पंचक्रोशीमध्ये शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्या भुवया उंचावले आहेत.
आज ज्ञानेश्वरच्या गोट फार्मवर (farm) १० शेळ्या आहेत. बेभरवशाच्या वातावरणात अचानक होणाऱ्या या बदलाने नेहमी तोट्यामध्ये येणाऱ्या शेतीव्यवसायाला पूरक म्हणून या सुशिक्षित तरुणाने शेळीपालन (Goat rearing) करताना पशूचे आजार, आहार, मार्केटिंग (Marketing), संगोपन या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करत जिद्द, चिकाटी आणि पुरेपूर वेळ देऊन दाटे येथे ज्ञानेश्वरी गोट फार्म नावाचा शेळीपालन व्यवसाय (Business) यशस्वीरीत्या सुरू केला आहे. मोरगाव येथील विलास समगीर आणि महेश समगीर यांनी या शेळ्या खरेदी केले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.