औरंगाबाद: महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस मंत्र्यांना अधिक आक्रमकपणे भूमिका मांडावी लागेल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते, काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांमध्ये अजूनही खदखद असल्याचे दिसून येत आहे. (Congress workers not get justice Mahavikas Aghadi government Amit Deshmukh)
हे देखील पहा-
राज्य सरकारमध्ये (State Government) काँग्रेसला न्याय मिळत नाही अशी खदखद औरंगाबादमध्ये (Aurangabad) झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात सर्व नेत्यांच्या भाषणात दिसून आली होती. त्यावर आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांची खदखद असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला जाणवले. तशी कार्यकर्त्यांची भावना आहे. कार्यकर्त्यामधील नाराजीची भावना दूर करायची असेल, तर काँग्रेसचे मंत्री म्हणून आम्हाला अधिक आक्रमकपणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका मांडावी लागेल. काय करावे लागेल हे पत्रकार परिषद सांगण्यासारखे नाही.
काल औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्याअनुषंगाने त्याठिकाणी प्रास्ताविकामध्ये ते सांगितले, हे तेवढ्यापुरते मर्यादित आहे. ६ महिन्यापूर्वी महाविकास आघाडीमधील काँग्रेस मंत्री आणि नेत्यांची नाराजी महाराष्ट्रासमोर (Maharashtra) आली होती. विधान परिषदेच्या (Legislative Council) जागेचा वाटप आणि राज्याच्या कारभारात विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यावेळी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केला होता. विधान परिषदेच्या जागा, महामंडळाच्या नियुक्त्या बाबत काँग्रेसचे नेते मंत्री नाराज होते. आता पुन्हा राज्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाराजीवरून आणि त्यांना न्याय मिळत नसल्यावरून नाराजीच्या चर्चेला फोडणी मिळण्याची शक्यता आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.