नाशिक: अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि शनिवारपासून पाकिस्तानात (Pakistan) उठलेल्या धुळीच्या वादळाने रविवारी गुजरातच्या (Gujarat) दिशेने सुरू असलेले मार्गक्रमण यामुळे शहराच्या (city) वातावरणामध्ये या ४ दिवसामध्ये कमालीचा बदल झाला आहे. या बदलामुळे नाशिककर (Nashik) देखील आश्चर्यचकित झाले आहेत. रविवारी दिवसभर नागरिकांना सूर्यदर्शन देखील दुर्लभ झाले होते. सोमवारी सकाळी उशिराने का होईना, सूर्यदर्शन घडले होते.
हे देखील पहा-
तसेच वातावरणात धुके आणि धुरक्यांचे प्रमाण देखील घटले आहे. यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. वाऱ्याचा (wind) वेग सोमवारी मंदावला होता. मात्र, पारा कमालीचा घसरल्यामुळे थंडीची तीव्रता प्रचंड वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला आहे. सोमवारी सकाळी हवेमध्ये आर्द्रता आणि बाष्पचे देखील प्रमाण कमी झाले असल्याचे दिसून आले आहे. अंधुक वातावरण (Atmosphere) देखील निवळले आहे. सकाळी आर्द्रता ६४ टक्के इतकी होती.
शहराच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये देखील काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. दिवसभर आकाश निरभ्र होते. दुपारपासून कडक ऊन पडले होते. गेल्या वर्षी १७ जानेवारी रोजी थंडीचा असाच कडाका नाशिककरांनी अनुभवला होता. त्या दिवशी देखील शहराचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली होती. २३ डिसेंबर रोजीसुद्धा पारा ८.२ अंशापर्यंत खाली घसरल्याने नाशिककर चांगलेच गारठले आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.