तळीरामांसाठी आनंदाची बातमी! आता वर्षभरात 21 ऐवजी फक्त 3 ‘ड्राय डे’

देशाची राजधानी दिल्लीमधून तळीरामांसाठी खूशखबर आली आहे.
 3 dry days in Delhi
3 dry days in DelhiSaam Tv

वृत्तसंस्था: देशाची राजधानी दिल्लीमधून तळीरामाकरिता खूशखबर आली आहे. दिल्ली सरकारने आता आपल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ड्राय डे ची संख्या कमी केली आहे. अगोदर वर्षात २१ दिवस ड्राय डे असायचे. मात्र, आता दिल्लीमध्ये (Delhi) फक्त ३ दिवस ड्राय- डे राहणार आहे. याविषयी नवा नियम (Rules) लागू करण्यात आला आहे. या बातमीनंतर तळीरामांमध्ये आनंदाची लाट उसळणार आहे. (Delhi News Updates: Only 3 dry days in Delhi)

कोणता दिवस ड्राय डे असेल?

दिल्ली सरकारने (government) जारी केलेल्या आदेशामध्ये सांगितले आहे की, परवानाधारक दारू आणि अफूची दुकाने प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) आणि 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशीच बंद राहणार आहेत.

हे देखील पहा-

हॉटेल आणि दुकानांना कोणता नियम लागू होणार?

दिल्ली उत्पादन शुल्क नियम २०१० (५२) च्या तरतुदींनुसार, २०२२ मध्ये २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि २ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली जाणार नाही. तसेच, उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार की एल-१५ परवाना असलेले हॉटेल चालक ड्राय-डेमध्ये ग्राहकांना त्यांच्या खोल्यांमध्ये दारू देऊ शकणार आहेत. मात्र, या ३ ड्राय- डे व्यतिरिक्त सरकार वर्षात कोणताही दिवस वेळोवेळी ‘ड्राय-डे’ म्हणून घोषित करू शकणार आहे, असे आदेशामध्ये सांगण्यात आले आहे.

 3 dry days in Delhi
Nashik: हातरुडीतील महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

नवीन उत्पादन शुल्क धोरण कधी लागू करण्यात आले आहे?

दिल्ली सरकारने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये नवीन उत्पादन शुल्क धोरणाला मंजुरी दिली होती. जे १७ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणामध्ये अनेक नियम बदलण्यात आले आहेत. सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणानुसार प्रत्येक प्रभागामध्ये ३ ते ४ दारूची दुकाने सुरू होत आहेत. याअगोदर असे ७९ वॉर्ड होते जेथे दारूचे दुकान नव्हते.

मागील वर्षीपर्यंत होळी, दिवाळी, जन्माष्टमी, मोहरम, ईद- उल- जुहा (बकरीद), गुड फ्रायडे, राम नवमी, महावीर जयंती, बुद्ध पौर्णिमा, महर्षि वाल्मिकी जयंती, गुरु नानक जयंती, दसरा आणि इतर सण ड्राय डे म्हणून पाळले जात होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com