नाशिक: महाविद्यालये (Colleges) सुरू होण्याअगोदरच पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा (Ashram School) अलंगुण (Alanguna) येथे ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थिनी (Student) भारती तुकाराम चौधरी वय १७ रा. हातरुडी हिने सकाळी ९ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील पडवीमध्ये लाकडी दांड्याला फडकीने गळफास (Throat) लावून आत्महत्या (self-slaughter) केली आहे. कोरोनामुळे (corona) शाळा, महाविद्यालये बंद होती. मात्र सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार होते. (Nashik College girl commits self slaughter)
हे देखील पहा-
काका हिरामण चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार की, कोरोनामुळे एक ते दीड वर्षापासून शाळा (School) बंदच असल्याने ऑनलाईन (Online) अभ्यास करण्याकरिता ॲन्ड्रॉईड मोबाईल (Mobile) नाही, पुरेसे नेटवर्क (Network) पण उपलब्ध नाही, मोबाईल घेण्याकरिता घरची आर्थिक परिस्थिती नाही. तसेच सारखे घरी राहून कंटाळली होती. या कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली असल्याचे तिच्या काकांनी सांगितले आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.