Crime News AI Photo
देश विदेश

Crime News: सावत्र आईचं भयानक कृत्य! ८ वर्षीय मुलीची केली निर्घृण हत्या; 'अशी' सापडली पोलिसांच्या जाळ्यात

Stepmother kills daughter: एका सावत्र आईने तिच्या ८ वर्षांच्या निष्पाप मुलीचा गळा आवळून हत्या केली आहे. नंतर मुलीचा मृतदेह जाळलं आणि पोत्यात घालून लाकडी पेटीत लपवलं.

Bhagyashree Kamble

एका सावत्र आईने तिच्या ८ वर्षांच्या निष्पाप मुलीचा गळा आवळून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. सावत्र आईनं आधी मुलीची गळा दाबून हत्या केली. मृत्यू झाल्यानंतर आरोपी आईनं तिच्या शरीराला जाळलं. यानंतर पुरावे लपविण्यासाठी तिने उरलेले शरीराचे अवशेष एका पोत्यात भरून लपवले. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी सावत्र आईला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बिहारमधील बक्सर जिल्हा सध्या सावत्र आईच्या कृत्यामुळे हादरलं आहे. बक्सरचे पोलिस अधीक्षक शुभम आर्य यांनी सांगितले की, पीडितेचे नाव आंचल कुमारी असे आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनी डुमराव पोलिस ठाण्यात मुलगी हरवली असल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेतला असता, मुलीचा मृतदेह एका घरात लाकडी पेटीत ठेवलेल्या पोत्यात आढळला. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

पोलीस अधिक्षक म्हणाले, "पोलिस पथकाने पीडितेच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना एका पोत्यात शरीराचे जळालेल्या अवस्थेत अवशेष सापडले. सुरुवातीच्या तपासादरम्यान, पीडितेच्या सावत्र आईने गुन्हा केल्याची कबुली दिली. तिने पोलिसांना सांगितले की, मुलीचा गळा दाबून हत्या केली होती. नंतर मृतदेह जाळून टाकला आणि उरलेले शरीराचे अवशेष पोत्यात भरून लपवून ठेवले''.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हत्येचा आरोप असलेल्या महिलेच्या कबुली जबाब आणि घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या मृतदेहाचे अवशेष वैज्ञानिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पीडितेचे वडील दिल्लीत राहतात. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT