Pune Crime News: 'तुझे वय काय, आमच्या मुलीचे वय काय?' लग्नाची मागणी घालणाऱ्या कामगाराला संपवलं

Shocking crime in Pune: पुण्यात एका व्यक्तीला वय जास्त असूनही मुलीला लग्नाची मागणी घातलीच कशी? असा प्रश्न विचारत बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.
Pune Crime
pune crime newsSaam Tv
Published On

लग्न करण्यापूर्वी वयासह बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. पण पुण्यात एका व्यक्तीला वय जास्त असूनही मुलीला लग्नाची मागणी घातलीच कशी? असा प्रश्न विचारत बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण इतकी भयंकर होती की, उपचारादरम्यान पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

पीडित व्यक्ती दिलीप अलकुंटे एका गॅरेजवर काम करत होता. तर आरोपी रामजी राठोड हे बिगारी कामगार आहेत. दिलीप याने रामजी राठोड याच्याकडे त्यांच्या मुलीशी लग्न करायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी रामजी यांचा राग अनावर झाला. रामजी याने ‘तुझे वय काय, आमच्या मुलीचे वय काय,’ असे म्हणत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

Pune Crime
Arvind Kejriwal: राज्यपाल की राष्ट्रपती? कोणती ऑफर मिळाली? ऐन निवडणुकीत केजरीवालांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर नेम

मारहाण करताना रामजीसोबत आणखी ३ जण होते. ‘याला आता जिवंत गाडू’ अशी धमकी देत दिलीपला बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण इतकी जबर होती की, यात दिलीप गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि दिलीपला खासगी रूग्णालयात दाखल केले.

रूग्णालयात दाखल केल्यानंतर दिलीपवर उपचार सुरू होते. मात्र, दिलीपला लाथाबुक्क्यांनी इतकी बेदम मारहाण करण्यात आली होती की, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली. तसेच चतुःशृंगी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime
Viral News: नवरा बायको दारू पिऊन तर्राट, चकना दिला नाही म्हणून पत्नीने रस्त्यावरच नवऱ्याला धोपटलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com