Villagers swim to safety after an overloaded boat capsized in the Bagmati River in Bihar’s Sitamarhi district. saam tv
देश विदेश

अंत्यविधीवरून परतताना मोठी दुर्घटना! 40 जणांना घेऊन जाणारी नाव पलटली

Overloaded Boat Capsizes In Bagmati River Sitamarhi Villagers Safe: बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात बागमती नदीत 40 जणांना घेऊन जाणारी ओव्हरलोड नाव पलटली. मात्र पाण्याची पातळी कमी असल्याने सर्व ग्रामस्थ सुखरूप बचावले.

Omkar Sonawane

बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील खडका गावाजवळ बागमती नदीत एक खासगी नाव उलटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 40 हून अधिक नागरिक नदीत पडले. मात्र पाण्याची पातळी कमी असल्याने सर्वजण सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, खडका गावातील सुमारे 70 वर्षीय मोहम्मद फरमान यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंकारानंतर ग्रामस्थ मृतदेह दफन करण्यासाठी नदीपलीकडील कब्रस्तानात जात होते. नदी पार करण्यासाठी घाटावर असलेल्या खासगी नावेत 40 पेक्षा अधिक लोक बसले होते.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नावेमध्ये साधारण 20 लोकांची क्षमता असताना त्यामध्ये जास्त प्रवासी बसल्याने काही अंतरावर गेल्यानंतर नाव डगमगू लागली आणि पलटली. मात्र, नदीतील पाणी कमी असल्याने सर्व ग्रामस्थांनी पोहत आणि कमेकांच्या मदतीने सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचण्यात यश मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ग्रामस्थांनी सांगितले की,इब्राहिमपूर दरम्यान बागमती नदीवर अद्याप सरकारी नाव सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे गावकऱ्यांना खासगी नावावरच अवलंबून राहावे लागते. नाव चालक दरवर्षी प्रत्येक कुटुंबाकडून ठराविक धान्य घेऊन ही सेवा पुरवतो. संबंधित अधिकारी विश्वमित्र खरबार यांनीही घटनास्थळी जाऊन, नावेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत, अशी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

Weather Update: मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट! या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT