Matheran Fort : इतिहास, साहस अन् हिरवागार निसर्ग; माथेरानपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Shreya Maskar

माथेरान

विकटगड ज्याला 'पेब किल्ला' म्हणूनही ओळखले जाते. हा रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या माथेरान डोंगररांगेत वसलेला आहे. हा किल्ला सुमारे ६४० मीटर (२,१०० फूट) उंचीवर वसलेला आहे.

Matheran | pinterest

विकटगड

विकटगड किल्ल्यावर तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. या मार्गावर दाट जंगल, हंगामी धबधबे आणि खडकात कोरलेल्या पायऱ्या आहेत , जिथे काही ठिकाणी हातांचा आधार घेऊन चढाई करावी लागते.

Vikatgad | google

कसं जाल?

विकटगड किल्ल्याला जाण्यासाठी नेरळ हे रेल्वे स्टेशनजवळ आहे. स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावी (फणसवाडी) पोहचाल.

how do you go | google

किल्ला कधी बांधला?

विकटगड किल्ला हा गिरीदुर्ग (डोंगर-किल्ला) असल्याचे समजते. १७ व्या शतकात या किल्ल्याला विशेष सामरिक महत्त्व प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील गुहांचा वापर धान्य साठवणुकीसाठी आणि टेहळणीची महत्त्वाची जागा म्हणून केला होता.

When was the fort built? | google

किल्ल्याचा आकार

विकटगड किल्ल्याला त्याचा विशिष्ट आकार खडकाळ शिखरामुळे प्राप्त झाला आहे. या शिखरावर मुकुटासारखी कडा आणि बाहेर आलेला खडक आहे.

The size of the fort | google

माथेरान

माथेरान हे आशियातील एकमेव ऑटोमोबाईल-मुक्त हिल स्टेशन आहे. पश्चिम घाटात 800 मीटर (2,625 फूट) उंचीवर वसलेले आहे.

Matheran | google

पावसाळी ट्रिप

पावसाळ्यात माथेरानला एक ट्रिप नक्कीच प्लान करा. येथे गेल्यावर घोडेस्वारीचा आनंद घेता येईल. तसेच येथील वास्तुकला देखील प्रसिद्ध आहे.

Rainy trip | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : रत्नागिरीतील ऐतिहासिक ठिकाण, पावसाळ्यात मित्रांसोबत 'या' किल्ल्यावर करा भटकंती

Ratnagiri Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा....