Shreya Maskar
कोकणात रत्नागिरी येथे 'विजयाचा किल्ला' म्हणून ओळखला जाणारा जयगड किल्ला वसलेला आहे. कोकणात गेल्यावर येथे फॅमिलीसोबत एक ट्रिप नक्कीच प्लान करा.
जयगड किल्ला १६ व्या शतकातील एक सागरी किल्ला आहे. विजापूरच्या सुलतानशाहीने बांधलेला हा किल्ला शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर एका उंच कड्यावर वसलेला आहे.
१८१८ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्यापूर्वी जयगड किल्ला मराठा नौदलाचा एक महत्त्वाचा तळ आणि संरक्षणात्मकदृष्ट्या अत्यंत मोक्याचा किल्ला ठरला होता.
जयगड किल्ला मराठा साम्राज्यातील नौदलाचे महान सरसेनापती कान्होजी आंग्रे यांचे प्रमुख केंद्र बनला.
जयगड किल्ला २५० फूट उंच कड्यावर १३ एकर परिसरात पसरलेला सागरी किल्ला आहे. या किल्ल्याची रचना नैसर्गिक द्वीपकल्पाच्या आकारानुसार केली गेली असून, यात वरच्या बाजूला एक मजबूत बालेकिल्ला, तटबंदी असलेली खालची संरक्षण फळी, २४ बुरूज आणि जमिनीकडील बाजूला खंदक यांचा समावेश आहे.
जयगड किल्ल्याच्या परिसरात गणपतीचे एक छोटेसे मंदिर आहे. जयगड किल्ल्यावरून अरबी समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
जयगड किल्ल्याला जाण्यासाठी मुंबईहून रत्नागिरीपर्यंत रेल्वेने प्रवास करा. पुढे रेल्वे स्टेशनपासून एसटी किंवा बसने प्रवास करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.