गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

Drought-Hit Farmers Struggle to Protect Cattle: दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढत चालली आहे. जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला चक्क कुलूप लावण्याची वेळ आली आहे. पाहूया एक खास रिपोर्ट...
Maharashtra farmers struggle to protect stored cattle fodder from theft
Maharashtra farmers struggle to protect stored cattle fodder from theftsaam tv
Published On: 

राज्यातल्या दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने पोटा-पाण्यासाठी ग्रामस्थ गाव सोडून जातायेत. तर दुसरीकडे पशुधनाचेही हाल होतायेत. इतकंच नाहीतर आता दुष्काळासोबत चोरीचंही संकट शेतकऱ्यांवर ओढावलंय. जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांवर चक्क वैरणीला कुलूप लावण्याची वेळ आलीय. एकतर चारा मिळणं कठीण झालंय. त्यामुळे असलेली वैरण जपून ठेवावी लागतेय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील हे भीषण वास्तव आहे. अंतरवाली खांडी गावात तर चारा-पाण्याचं संकट गंभीर बनलंय.

काही ठिकाणी तर जनावरांना केवळ एक वेळ चारा आणि एक वेळ पाणी देऊन दिवस काढले जात आहेत तर काही ठिकाणी चारा उपलब्ध नसल्याने पोटच्या लेकरासारखं वाढवलेल्या जनावरांना बाजारात विकण्याची वेळ आलीय.

सरकारनं चारा छावण्या लवकर सुरु कराव्यात, अशी मागणी विदर्भ आणि मराठवाड्यातून होतेय. एकीकडं ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी धडपड सुरू आहे. तर दुसरीकडं जनावरांना चारा आणि पाणी देऊन जगवताना बळीराजाची दमछाक होतेय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com