supreme court to election commission saam tv
देश विदेश

Bihar SIR : वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करा; निवडणूक आयोगाला 'सुप्रीम' आदेश

Bihar SIR : बिहारमधील मतदारयादी विशेष सखोल फेरतपासणीनंतर वगळण्यात आलेल्या ६५ लाख मतदारांच्या नावांची यादी कारणांसहित प्रसिद्ध करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिले आहेत.

Nandkumar Joshi

  • बिहारमधील SIR ला विरोध, सुप्रीम कोर्टात याचिका

  • सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

  • यादीतून वगळलेल्या ६५ लाख लोकांची यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश

  • प्रत्येक नावाच्या पुढे कारण देणे बंधनकारक

बिहारमधील एसआयआर (SIR) अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीसंदर्भात सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. मंगळवारपर्यंत मतदारयाद्यांमधून वगळण्यात आलेल्या ६५ लाख लोकांच्या नावाची यादी जिल्हा पातळीवर प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच त्यांच्या नावांच्या पुढे ते नाव का वगळण्यात आले याचे कारणही सांगण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे. ही यादी विभागीय आणि पंचायत पातळीवरील कार्यालयांतही लावण्यात यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीआधी मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीनंतर १ ऑगस्टला पहिला मसुदा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात ६५ लाख लोकांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. ६५ लाखांपैकी २२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३६ लाख लोक दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत किंवा ते संबंधित ठिकाणी आढळून आलेले नाहीत, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. तर ७ लाख असे मतदार आहेत की त्यांची नावे दोन ठिकाणी नोंदवण्यात आलेली होती.

बिहार विधानसभा निवडणुकांआधी राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. याविरोधात काही राजकीय पक्ष, नेते आणि एनजीओंनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर काही दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. यासंबंधी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. पुढील शुक्रवारी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे, असेही सांगितले. याबाबत जिल्हा पातळीवर आदेशाचे पालन होत असल्याचा अहवाल सुद्धा कोर्टाने आयोगाकडे मागितला आहे.

सुप्रीम कोर्टात न्या. सूर्यकांत आणि जॉयमाला बागची यांच्या खंडपीठानं याचिकाकर्ता आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांकडून युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अंतरिम आदेश दिला. २०२५ च्या समरी रिव्हिजननंतर मतदारयादीत ६५ लाख लोकांची नावे होती. मात्र, एसआयआरनंतर ड्राफ्ट लिस्टमधून ती हटवण्यात आली आहेत. त्यांची यादी जिल्हा पातळीवर प्रसिद्ध करण्यात यावी, असे आदेशात नमूद केले आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या वेबसाइटवर ही यादी उपलब्ध असावी. त्यात मतदार ओळखपत्र क्रमांक टाकून माहिती मिळू शकेल, तसेच ही यादी बूथनिहाय असायला हवी, असेही आदेशात नमूद केले आहे.

सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटले आहे की, प्रत्येक मतदाराच्या नावापुढे ड्राफ्ट मतदारयादीतून नाव वगळण्याचे कारणही असले पाहिजे. सर्वाधिक वितरण असलेल्या वर्तमानपत्रात त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यात यावा आणि टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून अशा प्रकारची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, हे सांगण्यात यावे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे सोशल मीडिया अकाउंट सक्रिय असतील तर त्याद्वारेही त्यांनी ही माहिती द्यावी, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT