Bihar Trafficked Teen Flees to Safety in Farms Saam
देश विदेश

शिक्षणासाठी घरातून पळाली अन् रेड लाइट एरियात अडकली; तिथून निसटली, पण शेतात काढावी लागली अख्खी रात्र

Trafficked Teen Flees to Safety in Farms: बिहारच्या किशनगंजमध्ये वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात तरुणीला अडकवण्याचा प्रयत्न. तरुणीने धाडसाने पळ काढत स्वत:चा जीव वाचवला.

Bhagyashree Kamble

बिहारच्या किशनगंज येथून वेश्याव्यवसायाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मध्य प्रदेशातील एका तरूणीला नोकरीचा प्रलोभन दाखवून या व्यवसायात भाग पाडण्यात आले आहे. तरूणीनं या वेश्याव्यवसायाच्या दलदलीतून स्वत:ची सुटका करून घेतली. तिनं तेथून पळ काढला आणि शेतात लपली. स्थानिक रहिवासी आणि पोलिसांनी तरूणीची मदत केली. शुक्रवारी तिला सुखरूप कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील गरीब कुटुंबात तरूणी वाढली. तिचे पालक तरूणीचे जबरदस्तीने लग्न लावून देत होते. तिला पुढे शिकायचं होतं. तिनं घरातून पळ काढला, ते थेट पाटना गाठला. तिथे लोकप्रिय शिक्षक खान सरांना भेटली. खानं सरांनी तिथे शिक्षणिक सुविधांचे आश्वासन दिले. परंतु राहण्याची आणि खाण्याची सोय तिला स्वत: करायची होती. या काळात तरूणी मॉलमध्ये नोकरी करू लागली.

मॉलमध्ये तिला २ अनोळखी तरूणी भेटल्या. तिला नोकरीचे आमिष दाखवले. तरूणी त्यांच्यासोबत पाटनाहून किशनगंजला पोहोचली. तिथे तिला रेड लाईट एरियामध्ये घेऊन गेल्या. तरूणीनं विरोध केला. तिला बेदम मारहाण करण्यात आली.

या छळाला कंटाळून तिनं तेथून पळ काढला. रात्री घरातून पळाली तसेच थेट शेत गाठले. स्थानिकांची भेट घेऊन सगळी आपबिती सांगितली. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती दिली. तिला पोलीस ठाण्यात नेले. तसेच पोलिसांनी मुलीला कुटुंबाकडे सुपूर्द केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चार दिवस काम ३ दिवस सुट्टी; भारतात लागू होणार नवा नियम? कसं असेल तुमच्या ड्युटीचं शेड्यूल

परीक्षा देऊन विद्यार्थिनी रिक्षाने घरी निघाली; रस्त्यात चालकाची नियत फिरली; निर्जनस्थळी अब्रू लुटली

Amaravati Accident : भयंकर! दरीत कोसळणाऱ्या बसला अडवताना विपरीत घडलं, चालकाचा जागीच मृत्यू

Beed Crime: कराड गँगची जिल्हा कारागृहात दादागिरी; पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

Monday Horoscope : कामाची दगदग वाढेल; ५ राशींच्या लोकांच्या डोक्याचं टेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT