कल्याणमध्ये चाललंय काय? फ्रँकी चालकाला मारहाण, क्षुल्लक कारणावरून राडा, पोलिसांची बघ्याची भूमिका?

Youth Assault Food Vendor at Katemanwali Junction: कल्याणच्या काटेमानवली नाक्यावर फ्रँकी दुकान चालवणाऱ्या एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • कल्याण पूर्वेतील धक्कादायक प्रकार

  • काटेमानवली नाक्यावर फ्रँकी दुकानचालकाला मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

  • कोळशेवाडी पोलिसांचा गुन्हेगारांना धाक नाही का? नागरिकांचा सवाल

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच कल्याण पुर्वेतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काटेमानवली नाक्यावर फ्रँकी दुकानचालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा संपू्र्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती घेतली, गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कल्याण पुर्वेत दिवसंदिवस गुन्हेगारी वाढ होत आहे. असाच एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रकार काल घडला आहे. कल्याण पूर्व काटेमानवली नाक्याजवळील फ्रँकी दुकानचालकावर झालेल्या मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून, संपूर्ण प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय.

Crime News
'मी मराठी आहे, बिहारींचं ऐकणार नाही', बॉसला अद्दल घडवण्यासाठी महिलेनं घेतली मनसे कार्यकर्त्यांची मदत, VIDEO व्हायरल

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही तरुणांनी किरकोळ वादाचे कारण सांगत दुकानचालकाला अचानक मारहाण केली. मारहाणीनंतर आरोपी तेथून पसार झाले. स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी फक्त माहिती घेतली. मात्र अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. यामुळे पोलिसांच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.

Crime News
ऐन निवडणुकीत अजित दादांच्या गटात धुसफूस, आमदाराची 'मुंडेंना पाठवू नकाच', अशी मागणी; कारण काय?

मारहाणीत दुकानचालकाला किरकोळ दुखापत झाली असून, त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत. दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनी अशा घटनांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Crime News
पुण्यातील हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; विदेशी महिलांचा बाजार, पोलिसांनी 'असा' उघडा पाडला डाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com