Surabhi Jayashree Jagdish
कोकणातील स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी शिरोडा बीच हा विशेष प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा बीच स्वच्छ वाळू, निळाशार समुद्र आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांना आकर्षित करतो.
शिरोडा बीच महाराष्ट्रातील शिरोडा या गावाजवळ आहे. हा समुद्रकिनारा सिंधुदूर्ग मधील वेंगुर्ला तालुक्यात येतो. गोवा राज्याच्या सीमेजवळ असल्यामुळे देश-विदेशातील पर्यटक सहज पोहोचतात.
गोवा पर्यटनस्थळांपासून जवळ असल्यामुळे अनेक विदेशी पर्यटक शिरोडा बीचला भेट देतात. इथली स्वच्छता आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. म्हणूनच स्थानिक पातळीवर या बीचला कोकणचा इंटरनॅशनल बीच अशी ओळख मिळालीये.
शिरोडा बीच सुमारे ३–४ किमी लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आहे. याठिकाणची पांढरी मऊ वाळू, नारळाच्या झाडांच्या रांगा आणि निळा समुद्र अत्यंत आकर्षक दिसतो.
या बीचवर पर्यटक समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका, फोटोग्राफी आणि विश्रांतीचा आनंद घेतात. शांत आणि गर्दी कमी असल्यामुळे हा बीच रिलॅक्सेशनसाठी उत्तम मानला जातो. हिवाळ्यात पर्यटनाची संख्या विशेष वाढते.
शिरोडा गावाजवळ प्रसिद्ध वेताळ देऊळ आहे. स्थानिक लोकांमध्ये या देवस्थानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पर्यटक समुद्रकिनाऱ्यासोबत या मंदिरालाही भेट देतात.