भारतीय लष्कराचं (Indian Air Force) मायक्रो एअरक्राफ्ट शेतात कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमध्ये घडली (Aircraft Crash) आहे. अचानक मोठा आवाज करत विमान शेतात कोसळलं. विमान खाली कोसळताच ग्रामस्थांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. या विमानाला पाहण्यासाठी काही वेळातच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (latest accident news)
अचानक विमान खाली कोसळताच शेतात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शेतात काम करणारे लोकं सैरावैरा धावत होते. बगदाहा गावात आर्मीचं मायक्रो एअरक्राफ्टच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळं शेतात (Gaya Aircraft News) कोसळलं. या विमानात दोन पायलट उपस्थित होते. मात्र या घटनेत दोन्ही पायलट थोडक्यात बचावले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळलं
बिहारमधील गया जिल्ह्यातील बोधगया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बगदाहा गावात लष्कराचं विमान कोसळलं आहे. ग्रामस्थांनी सांगितलं की, मायक्रो एअरक्राफ्टचं प्रशिक्षण देण्यासाठी पायलटने उड्डाण केलं (Micro Aircraft Crash) होतं. विमान बोधगयाच्या बगदाहा गावात पोहोचताच अचानक मोठा आवाज करत ते खाली कोसळलं. त्यादरम्यान गावातील ग्रामस्थांमध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
विमान खाली पडल्यानंतर तेथे शेकडो ग्रामस्थांचा जमाव जमला. मात्र, घटनेची माहिती मिळताच लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या खराब झालेले विमान प्लॅस्टिकच्या आवरणानं झाकून ते पुन्हा कॅम्पमध्ये नेण्याची तयारी सुरू (Bihar News) आहे.
यापूर्वीही अशी घटना
तेथे उपस्थित असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, मायक्रो एअरक्राफ्टने प्रशिक्षणासाठी उड्डाण केलं होतं. अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं ते शेतात पडलं. खराब झालेले विमान पुन्हा छावणीत नेण्याची तयारी सुरू ( Indian Air Force Micro Aircraft Crash) आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना अचानक मोठा आवाज ऐकला. तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा त्यांना त्यांच्या गव्हाच्या शेतात लष्कराचं एक लहान विमान पडलेलं दिसलं.
या घटनेमुळे शेतातील गव्हाच्या पीकाचंही नुकसान झालं आहे. याआधी 28 जानेवारी 2022 रोजीही याच गावात (Bodhgaya) लष्कराचं विमान पडल्याची घटना घडली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.