Idigo Airline Flight: लँडिंगनंतर विमान चुकलं रस्ता, दिल्ली विमानतळावर एकच गोंधळ

Flight Misses Taxiway After Landing: विमानतळावर लँडिंग केल्यानंतर विमानच रस्ता चुकल्याची घटना घडली आहे. ही घटना दिल्ली विमानतळावर घडली आहे.
Idigo Flight
Idigo Flight Saam Tv
Published On

Delhi Indira Gandhi International Airport Incident

अमृतसरहून आलेले इंडिगोचे विमान आज सकाळी दिल्ली (Delhi Airport) विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीवे चुकले (Flight Misses Taxiway) होते. विमान टॅक्सीवे चुकल्याने अनेक उड्डाणांवर याचा परिणाम झाला आहे. यानंतर धावपट्टीवर एकच गोंधळ उडाला होता. (latest marathi news)

अमृतसरहून आलेले इंडिगोचे विमान आज सकाळी दिल्ली (Delhi) विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीवे चुकले. त्यामुळे एक धावपट्टी सुमारे 15 मिनिटे ठप्प झाली होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGIA) नियोजित टॅक्सीवे चुकल्याने विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकावर गेल्याची घटना घडली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

देशातील सर्वात मोठं विमानतळ

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Delhi Indira Gandhi International Airport) हे देशातील सर्वात मोठे विमानतळ आहे. तिथे दररोज 1400 हून अधिक उड्डाणे होतात. या विमानतळावर 4 धावपट्टी कार्यरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या विमानतळावरून अशा घटना समोर येत आहेत.

31 जानेवारी रोजी इंडिगोने देवघर, झारखंडला जाणारे फ्लाइट रद्द केल्यानंतर प्रवाशांनी केलेल्या विरोधामुळे दिल्ली विमानतळावर संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला होता. त्यांनी 'इंडिगो चोर है'च्या घोषणाही दिल्या होत्या. याशिवाय गेल्या महिन्यात क्रिकेटर मयंक अग्रवालने दिल्लीहून जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये (Idigo Airline Flight) विषारी पेय प्यायल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Idigo Flight
Emergency Landing Of Indigo Flight: मुंबईहून विमानात बसले, गुवाहाटीऐवजी थेट बांग्लादेशात उतरले, नेमकं काय घडलं?

यापूर्वी समोर आलेली प्रकरणं

जानेवारीतच दुसऱ्या एका घटनेत दिल्लीहून बाकूला जाणाऱ्या इंडिगोच्या (Indigo Flight) विमानाच्या वैमानिकांना ड्युटीवरून काढून टाकण्यात आलं होतं. कारण या वैमानिकांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कडून मंजुरी न घेता उड्डाण केलं होतं. यासोबतच विमानाच्या धावपट्टीवर जेवण करताना प्रवाशांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरी उड्डयन सुरक्षा मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

Idigo Flight
Mumbai To Ayodhya Flight: 'मायानगरी ते रामनगरी'; दिल्ली,अहमदाबादनंतर आता मुंबईहून 'ही' विमानसेवा सुरू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com