Bansidhar Brajwasi and Rahul Raj face disqualification controversy saam tv
देश विदेश

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Bihar Legislative Council Row: बिहारमधील बन्सीधर ब्रजवासी आणि राहुल राज या दोन अपक्ष उमेदवारांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. भाजप प्रवेशामुळे आमदारकीवर अपात्रतेचे संकट निर्माण झाल्याची चर्चा आहे. पक्षांतर बंदी कायद्यात नेमकी काय तरतूद आहे, जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • दोन अपक्ष बिहार विधान परिषद सदस्यांची आमदारकी जाणार का?

  • दोन अपक्ष आमदारांविरोधात जनसुराज पक्षाची तक्रार

  • पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपक्ष आमदार अपात्र ठरू शकतो का?

विधान परिषदेत विजयी झालेले बन्सीधर ब्रजवासी आणि राहुल राज हे दोन अपक्ष सदस्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतील या दोन अपक्ष उमेदवारांच्या आमदारकीवर संकट आलंय. या दोन्ही अपक्ष सदस्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे. दोन्ही अपक्ष नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. त्यानंतर, निवडणूक जिंकल्यानंतर एखाद्या अपक्ष उमेदवाराने राजकीय पक्षात प्रवेश केल्यास, विधान परिषदेतील त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते का, यावर चर्चा सुरू झालीय.

विधान परिषदेच्या एका अपक्ष सदस्याने स्पष्टीकरण दिलं की, ते भाजपला पाठिंबा देत आहेत. त्यांनी पक्षात प्रवेश केलेला नाही, केवळ आपला पाठिंबा दर्शवलाय. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आरजेडी या मुद्द्याचा वापर करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. तर 'जन सुराज' पक्षाने या प्रकरणी कायदेशीर लढाई लढण्याची घोषणाही केलीय.

या घटनाक्रमात 'जन सुराज' पक्षाच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी विधान परिषदेचे कार्यवाहक सभापती प्रा. रामवचन राय यांची भेट घेतली. बन्सीधर ब्रजवासी व राहुल राज यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आलीय. या दोघांविरुद्ध कारवाईची मागणी करत 'जन सुराज'च्या शिष्टमंडळाने विधान परिषदेच्या सभापतींकडे पेन ड्राइव्हसह विविध पुरावे सादर केलेत.

जन सुराज पक्षाने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, दोन्ही अपक्ष आमदारांची भाजपमध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे. दरम्यान बिहार विधान परिषदेच्या कार्यवाह अध्यक्षांनी त्या तक्रारीनंतर सांगितलं की, कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर, नियम आणि कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

'जन सुराज' कायदेशीर लढाई लढणार

याआधी जेव्हा बिहार विधान परिषदेचे दोन अपक्ष सदस्य बन्शीधर ब्रजवासी आणि राहुल राज भाजपमध्ये सामील झाले होते. तेव्हा 'जन सुराज'ने या कृतीला असंवैधानिक ठरवले होतं. त्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्याची घोषणा केली होती. ते विधान परिषदेच्या सभापतींकडे याचिका दाखल करून या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करतील. तसेच गरज पडल्यास उच्च न्यायालयातही दाद मागतील, असं जन सुराज पक्षानं म्हटलं होतं.

रविवारी 'जन सुराज'चे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार सौरभ यांनी आरोप केला की, भाजप पैसा, सत्तेचा वापर आणि प्रभावाच्या जोरावर निवडणूक निकालांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे. बिहार विधान परिषदेच्या चार शिक्षक मतदारसंघांतील आणि चार पदवीधर मतदारसंघांतील निवडणुकीचे निकाल २७ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. यात भाजपने दोन जागा जिंकल्या, अपक्ष उमेदवारांनी दोन जागा मिळवल्या. तर आरजेडीने दोन, जेडी(यू)ने एक आणि जन सुराजने एक जागा जिंकली होती.

आमदारकी जाऊ शकते? काय आहे नियम?

निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ७२ तासांच्या आत निवडून आलेले दोन अपक्ष उमेदवार भाजपमध्ये सामील झाले. सौरभ यांनी सांगितले की, सारण शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले राहुल राज आणि तिरहुत पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले बन्सीधर ब्रजवासी हे भाजपमध्ये सामील झालेत. परंतु राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीचा तसेच कलम १०२(२) आणि १९२(२) चा संदर्भानुसार जर एखादा अपक्ष उमेदवार निवडणूक जिंकल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात सामील झाला, तर विधान परिषदेतील त्याचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

अजित पवार गटात नाराजीनाट्य आहे? कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी थेटच सांगितलं

SCROLL FOR NEXT