Cm Nitish Kumar
Cm Nitish Kumar Saam Tv
देश विदेश

Nitish Kumar: पश्चिम बंगाल, पंजाबनंतर बिहारमध्ये इंडिया आघाडीला धक्का? नितीश कुमार पुन्हा 'एनडीए'मध्ये होणार सहभागी?

Vishal Gangurde

प्रमोद जगताप,मुंबई

Nitish Kumar News:

बिहारमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. पश्चिम बंगाल, पंजाबनंतर आता बिहारमध्ये इंडिया आघाडीला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारच्या राजकारणात नितीश कुमार पुन्हा एकदा यू-टर्न घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

याचदरम्यान, लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांच्या ट्विटनंतर बिहारच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही तासांपूर्वीच रोहिणी यांनी नितीश कुमार यांच्या सततच्या बदलती भूमिका आणि समाजवादी विचारधारेवर त्यांचं नाव न घेता निशाणा साधला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नितीश कुमार इंडिया आघाडीची साथ सोडणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा 'एकला चलो' चा नारा दिला. तर दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही स्वबळावर लढणार असल्याची जाहीर केलं. त्यामुळे इंडिया आघाडीच्या एकजुटीला तडा गेला आहे. त्यातच आता नितीश कुमार हे देखील इंडिया आघाडीची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे.

बिहारच्या राजकीय घडामोडींना वेग

रोहिणी आचार्य यांनी ट्विट केल्यानंतर बिहारचं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. सूत्रांच्या माहितीनुसार लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याची माहिती आहे. मात्र, इंडिया आघाडीत हे सर्व सुरु असताना बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी हे बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले. सम्राट चौधरी यांच्यासोबत बिहारच्या माजी उप मुख्यमंत्री रेणु देवी देखील सोबत होत्या.

या सर्व नेत्यांमध्ये बिहारमधील घडामोडीवर बैठक झाल्याची माहिती मिळतेय. त्यांची बैठक झाल्यावर सर्व नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी गेल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, बिहारमधील घडामोडी सुरु असताना जे. पी. नड्डा यांनीही केरळचा दौरा रद्दा केल्याची माहिती मिळतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

SCROLL FOR NEXT