Woman Killed by Husband in Katihar Saam Tv
देश विदेश

दोघेही रंगाने सावळे, मग मुल गोरं कसं झालं? नवऱ्याकडून चारित्र्यावर संशय, बायकोला झोपेतच संपवलं

Woman Killed by Husband in Katihar: बिहारच्या कटिहार जिल्ह्यात पतीनं पत्नीची गळा चिरून हत्या केली. मुलाचा रंग गोरा असल्यानं पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता.

Bhagyashree Kamble

  • नवरा - बायको रंगाने सावळे

  • मुल गोरं कसं झालं?

  • पतीला संशय

  • पत्नीला मध्यरात्री गळा चिरून संपवलं

बिहारच्या कटिहार जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. नवऱ्यानं बायकोची निर्घृण हत्या केली आहे. तिची गळा चिरून हत्या केली आहे. महिलेनं दुसऱ्या बाळाला तीन महिन्यांपूर्वी जन्म दिला होता. मुलाचा रंग उजळ होता. त्यामुळे नवऱ्याला संशय येऊ लागला. याच संशयातून पतीनं पत्नीसोबत नेहमी भांडत होता. या भांडणाच्या रागातून नवऱ्यानं बायकोची गळा चिरून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

ही धक्कादायक घटना बिहारच्या कटिहर जिल्ह्यातील आबादपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणपूर गावात घडली. मौसमी दास (वय वर्ष २२) असे मृत महिलेचं नाव आहे. तर, सुकूमार दास असे पतीचे (आरोपी) नाव आहे. मौसमी २ लहान मुलांची आई होती. लहान मुल तीन महिन्यांपूर्वी झालं होतं. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यांपूर्वी मौसमीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. मुलाचा रंग गोरा पाहून पतीला संशय येऊ लागला.

पतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. पती आणि पत्नीचा रंग सावळा असल्याकारणाने, तो मुलाला स्वत:चे मानत नव्हता. या संशयामुळे दोघांमध्ये सतत वाद झाले होते. दोघेही अनेक महिन्यांपासून एकमेकांशी भांडत होते. पत्नी माहेरी गेली होती. पती घटनेच्या आदल्या दिवशी पत्नीच्या माहेरी गेला. रात्रीच्या अंधारात पतीनं धारदार शस्त्राने मौसमीचा गळा चिरला. त्यानं तिच्या प्रायव्हेट पार्टवरही वार केले.

नंतर तेथून आरोपी पसार झाला. यानंतर मृत महिलेचे वडील षष्ठी दास यांनी आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच आबादपूर पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. पोलीस अधिकारी शादाब अहमद यांनी सांगितले की, आरोपी सुकुमार दासविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आर्थिक संबंधांपलीकडे मानवी मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि परस्पर संवाद आवश्यक- CM फडणवीस

Styling Tips: महागडे कपडे न घालताही दिसाल एकदम क्लासी! लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ स्टाइलिंग टिप्स

Dangerous Fort : १ चुकीचं पाऊल अन् थेट २,२५० फूट खोल दरीत, सूर्य मावळल्यानंतर 'या' किल्ल्याजवळ कुणी फिरकत नाही

Maharashtra News Live Update: सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला

Snake Bite: सापाचे विष किती प्रकारचे असते, शरीरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT