मुख्यमंत्री पदावरून जुंपली, उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांची काँग्रेसच्या हायकमांडसोबत भेट, कर्नाटकात राजकीय भूकंप?

Congress in Karnataka Faces Internal Uproar: उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे काही मंत्री आणि आमदारांनी दिल्लीमध्ये काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचा विषय ठेवला.
Congress in Karnataka Faces Internal Uproar
Congress in Karnataka Faces Internal UproarSaam
Published On
Summary
  • कर्नाटकात मुख्यमंत्रिपदावरून तणाव

  • शिवकुमार गटाच्या नेत्यांनी घेतली मल्लिकार्जून खर्गेंची भेट

  • भेटीत डी.के शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याच्या विषयावर चर्चा

मुख्यमंत्रिपदावरून कर्नाटकात पुन्हा एकदा राजकारण तापलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्यातील तणाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डी.के शिवकुमार यांच्या काही मंत्र्यांनी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. या भेटीत ठरलेल्या करारानुसार,डी.के शिवकुमार यांना आता मुख्यमंत्री करावे, या विषयावर चर्चा झाली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार यांच्या जवळचे मानले जाणारे तीन आमदार आणि एक मंत्री गुरूवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले. मंत्री एन. चलुवरायसामी, आमदार इक्बाल हुसैन, एच.सी बालकृष्ण, एस.आर श्रीनिवास आणि टी.डी. राजेगौडा यांनी मल्लिकाअर्जून यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर, डी.के शिवकुमार यांचे समर्थक आमदार टी.डी राजेगौडा यांची काँग्रेसचे संघटन महासचिव वेणुगोपाल यांची भेट घेतली.

Congress in Karnataka Faces Internal Uproar
मुंबईत इमरान हाश्मींची ठाकरे सेनेत एन्ट्री! शिवसेनेकडून अजित पवार अन् भाजपला जबरदस्त धक्का

निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर काही वेळातच हे नेते तेथून निघून गेले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली. सरकार स्थापन करण्यापूर्वी त्यांच्यात करार झाला होता. या करारानुसार, उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, यासाठी डी.के शिवकुमार गट आग्रही आहे. यावेळी डी.के शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांची भेट घेतली. तसेच या करारावर चर्चा केली.

Congress in Karnataka Faces Internal Uproar
गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये नेलं, शरीरसंबध ठेवण्यापूर्वी शक्तिवर्धक गोळ्या खाल्ल्या; क्षणात तरूणाचा मृत्यू

दरम्यान, याविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 'माझी सत्ता आता आणि भविष्यातही सुरक्षित आहे आणि राहिल', असं म्हटलं आहे. 'जनतेला दिलेले आश्वासनं पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत', असंही सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. यावेळी सिद्धरामय्या यांना ' पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री राहणार का? ' असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी, अनावश्यक चर्चा असल्याचं म्हटलंय. 'केवळ अडीच वर्षांत मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री बदलण्याचा मुद्दा पुढे आला. ३४ मंत्रिपदांपैकी २ पदे सध्या रिक्त आहेत. ते रिक्त मंत्रिपद फेरबदलादरम्यान भरले जातील',असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Congress in Karnataka Faces Internal Uproar
पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com