Bihar Heat Wave: सूर्य आग ओकतोय! बिहारमध्ये उष्णाघातामुळे 10 निवडणूक कर्मचाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू
Bihar Heat Wave saam tv
देश विदेश

Bihar Heat Wave: सूर्य आग ओकतोय! बिहारमध्ये उष्णाघातामुळे 10 निवडणूक कर्मचाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू

Priya More

बिहारमध्ये (Bihar) सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. बिहारमध्ये वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांसह प्राण्यांना देखील बसत आहे. बिहारमधील अनेक ठिकाणचे तापमान हे ४७ अंश सेल्सिअस पार गेले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. उन्हामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता बिहारमधील शाळा, कॉलेज, अंगणवाडींना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. अशामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये बिहारमध्ये १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यामध्ये १० निवडणूक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

बिहारच्या आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये २४ तासांमध्ये १० निवडणूक कर्मचाऱ्यांसह १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यामधील सर्वाधिक जण हे भोजपूरमधील आहेत. याठिकाणी ५ निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त रोहतासमध्ये ३ निवडणूक अधिकाऱ्यांचा आणि कैमूर तसंच औरंगाबादमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. बिहारमध्ये सध्या सगळीकडे तीव्र उष्णता जाणवत आहे. अनेक भागात सर्वाधिक तापमान ४४ अंशापेक्षा जास्त आहे. गुरूवारी बक्सरमध्ये सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बिहारमधील उष्णतेची लाट लक्षात घेता सरकारने सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग संस्था आणि अंगणवाडी केंद्रे ८ जूनपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या ४० जागांसाठी सात टप्प्यामध्ये मतदान होत आहे. शनिवारी ८ जागांसाठी मतदान होणार आहे. अशामध्ये नागरिकांनी मतदान करण्यासाठी जाताना काळजी घ्यावी. तसंच सकाळीच मतदान करण्यासाठी जावे असे आवाहन केले जात आहे. दरम्यान, गुरूवारी बिहारमधील बक्सर, भोजपूर, रोहतास, भभुआ, औरंगाबाद आणि अरवल येथे कमाल तापमान ४६ अंश ते ४८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. तर दक्षिण मध्य पाटणा, गया, नालंदा, शेखपुरा, नवादा, बेगुसराय, लखीसराय, जहानाबाद येथे कमाल तापमान ४४ ते ४६ अंशांच्या दरम्यान होते. २४ तास हवामान कोरडे होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-Pakistan: चॅम्पियन्स ट्रॉफीत रंगणार थरार; भारत-पाकिस्तान येणार आमनेसामने; कधी होणार सामने?

Vastu Tips: घरामधील 'या' दिशेला मनी प्लांट लावल्यास होईल धनलाभ

Ashadhi Wari 2024: संत सोपानकाकांची पालखी विठुरायाच्या दिशेने मार्गस्थ!

Bhushi Dam Incident: भुशी धरण दुर्घटना दुर्दैवी, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत; राज्य सरकारची घोषणा

Bhandara: दुर्देवी घटना! झेडपी शाळेत शॉक लागून विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT