बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नितीश सरकारने सोमवारी बिहार विधानसभेत फ्लोअर टेस्ट पास केली आहे. मतदानापूर्वीच विरोधकांनी सभात्याग केला होता. सत्ताधारी पक्षाच्या मागणीनुसार मतदान घेण्यात आले. याच्या समर्थनार्थ 129 मते पडली. विरोधात एकही मत पडले नाही.
मात्र फ्लोअर टेस्ट आधी आरजेडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती अवध बिहारी चौधरी यांना पदावरून हटवण्यात आले. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे कामकाज सुरू होताच जेडीयू आमदारांच्या वतीने सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बिहार विधानसभेचे अध्यक्ष आणि आरजेडी नेते अवध बिहारी चौधरी यांना हटवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर बहुमताच्या जोरावर त्यांना पदावरून हटवण्यात आले. फ्लोअर टेस्टच्या आधी अवध बिहारी चौधरी यांच्याविरुद्ध राज्य विधानसभेत अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 125 सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने तर 112 सदस्यांनी विरोधात मतदान केले. (Latest Marathi News)
तेजस्वी यादव यांच्या पक्षाचे आरजेडी आमदार आणि सभापती अवध बिहारी चौधरी यांनी नितीश यांच्या पक्षांतरानंतरच विधानसभा अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला होता. अशातच विधानसभेचे कामकाज चालविण्यापासून ते विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्यापर्यंत सभापतींची भूमिका महत्त्वाची असते.
यातच बिहारमध्ये फ्लोअर टेस्ट आधीच आरजेडी नेते आणि नितीश यांच्या आघाडी सरकारमधील माजी मंत्री सुधाकर सिंह यांनी विधानसभेचे अध्यक्ष आमचेच असतील आणि नवीन सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकणार नाही, असा दावा केला आहे. याच कारणामुळे नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने सर्वात आधी स्पीकर हटवण्याचा आग्रह धरला होता आणि नंतर फ्लोअर टेस्ट घेण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.