Bihar Election: Nitish Kumar’s Bargaining Power Drops as BJP Leads Big  PTI
देश विदेश

Bihar Election : नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर संपली! भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा ठोकणार का? महत्त्वाचं कारणं

Can BJP form government without Nitish Kumar in Bihar? बिहार निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असून एनडीएला विक्रमी बहुमत मिळाले आहे. नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा, तसेच भाजप मुख्यमंत्रीपदाचा दावा करणार का याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Namdeo Kumbhar

Bihar Assembly Election Result Live Update : बिहारमध्ये भाजप प्रणित एनडीएने ऐतिहासिक विजयाकडे आगेकूच केली आहे. २४३ जागांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीने २०७ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामध्ये एकटा भाजप ९५ जागांवर आघाडीवर आहे. तर नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड ८३ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, एनडीएचा मित्रपक्ष असलेला पासवान यांचा लोकजनशक्ती पार्टी जवळपास २० जागांवर आघाडीवर आहे. विरोधकांचा सुपडा साफ झालाय. तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल फक्त २४ तर काँग्रेस दोन जागांवरच आघाडीवर आहे. बिहारमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कुणाचा होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. (Will BJP announce its own CM face after becoming largest party in Bihar?)

बिहार विधानसभेच्या इतिहासात भाजपला पहिल्यांदाच इतके मोठं यश मिळाले आहे. भाजपने १०१ जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. त्यापैकी तब्बल ९५ जागांवर आघाडीवर आहेत. दुसर्‍या क्रमांकावर असणाऱ्या नितीश कुमारांची पार्टी जेडीयू ८३ जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये सत्ता कुणाची येणार, हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा सुरू झाली आहे. एनडीएने नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. विजय झाला तर नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, अशी अधिकृत घोषणा एनडीएकडून झालेली नव्हती. त्यामुळे आता सर्वात मोठा पक्ष झाल्यानंतर भाजप मुख्यमंत्रि‍पदावर दावा ठोकणार का? भाजप मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा दाहीर करणार का? याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कारण, सध्याच्या आकड्यावरून नितीश कुमार यांच्याशिवाय सुद्धा भाजप सत्ता स्थापन करू शकते.

नितीश कुमारांशिवाय भाजप सत्ता स्थापन करणार?

एनडीएमध्ये असणाऱ्या चिराग पासवान यांच्या एलजेपी (आर) पक्षाचे २१ उमेदवार आघाडीवर आहेत. जीतन राम मांझी यांच्या Hindustani Awam Morcha (Secular) - HAMS पक्षाचे ५ उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या Rashtriya Lok Morcha - RSHTLKM पक्षाचे ४ उमेदवार आहेत. पासवान, मांझी आणि कुशवाह यांच्या पक्षाचे ३० आणि भाजपचे ९५ एकत्र आले तर एकूण संख्या १२५ इतकी होते. भाजपमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जादुई आकडा १२२ इतका आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्याशिवाही भाजप सरकार स्थापन करू शकते. त्यामुळेच भाजप मुख्यमंत्रि‍पदावर दावा ठोकणार का? अशी चर्चा सुरू झाली.

नितीश कुमारांची बार्गेनिंग पॉवर संपली, पण....

सध्याच्या आकड्यांनुसार, नितीश कुमार यांची बिहारमध्ये बार्गेनिंग पॉवर संपल्यात जमा झाली आहे. नितीश कुमार यांचे उमेदवार फक्त ८३ जागांवर आघाडीवर आहेत. त्यांच्याशिवाय बिहारमध्ये सत्ता स्थापन होऊ शकते. भाजप तसा प्रयत्न करेलही पण केंद्रामध्ये नितीश कुमार यांचा मोदी सरकारला पाठिंबा असल्याचे विसरता कामा नये.

चिराग पासवानसोबतचा राजकीय संघर्ष?

चिराग पासवान, जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्यासोबत नितीश कुमार यांचे आधी राजकीय खटके उडाले होते. त्यामुळे या तिन्ही पक्ष आता कोणती भूमिका घेणार.. नितीश कुमारांच्या मुख्यमंत्रि‍पदाला विरोध कराणार की? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुख्यमंत्रि‍पदाचा चेहराच दिला नाही -

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एनडीएकडून अधिकृत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहराच देण्यात आला नव्हता. त्यामुळे आता सत्तेची गणिते स्पष्ट झाल्यानंतर भाजपही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा देण्याची शक्यता आहे. एनडीएमधील नेत्यांकडून नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, म्हणून सांगण्यात येत असले तरीही यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रि‍पदावर दावा ठोकला जाऊ शकतो. बिहार भाजपमध्ये तशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: नोकरी व्यवसायात मिळेल यशच यश, रखडलेली कामे पूर्ण होणार, वाचा राशीभविष्य

Mumbai: जंगलाची राणी पुन्हा येतेय! 'वनराणी' टॉय ट्रेन लवकरच धावणार, फुलपाखराच्या आकाराचं स्टेशन अन्...

252 कोटींचं ड्रग्ज कनेक्शन उघड; दाऊदचा भाचा, श्रद्धा कपूरच्या नावाचा समावेश, मनोरंजन विश्वात खळबळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नाशिकच्या वनविहार कॉलनी परिसरात आणखी एक बिबट्या

Chanakya Niti: तुमच्या चांगुलपणाचा फायदा तर घेत नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली माणसं ओळखण्याची ट्रिक

SCROLL FOR NEXT