Bihar Assembly Election Saam Tv
देश विदेश

Election: उमेदवारी न मिळाल्यानं अंगावरचे कपडे टराटरा फाडले, रस्त्यावर लोळला; नेत्याचा VIDEO व्हायरल

Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आरजेडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाव न आल्यामुळे अनेकांना धक्का बसला. यापैकी एक असलेल्या मदन शाह यांनी थेट लालू प्रसाद यादव यांच्या घराबाहेर राडा केला.

Priya More

Summary -

  • बिहार निवडणुकीदरम्यान आरजेडी नेते मदन शाह यांचा भावनिक व्हिडीओ समोर आलाय

  • तिकीट नाकारल्याने त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या घरासमोर कपडे फाडून राडा केला

  • पैसे न दिल्यामुळे माझे तिकीट कापले असा आरोप त्यांनी केला

  • व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिहारमध्ये खळबळ उडाली

बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकारण चांगलेच तापले आहे. तिकीट न मिळाल्यामुळे अनेक पक्षांचे नेते रडतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. भाजप नेते अजय झा तिकीट नाकारल्यामुळे ढसाढसा रडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आरजेडीच्या एका नेत्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेला आरजेडीचा नेता ढसाढसा रडला, त्यांनी कपडे फाडले आणि रस्त्यावर लोळू लागले.

तिकीट न मिळाल्यामुळे पाटण्यात आणखी एक नाट्यमय दृश्य पाहायला मिळाले. नुकताच राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आरजेडीने विधानसभेसाठीची यादी जाहीरे केली. या यादीमध्ये आपले नाव न आल्यामुळे अनेकांना धक्का बसला. मधुबन विधानसभा मतदारसंघातून तिकीटासाठी दावेदार असलेल्या मदन शाह यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या घरासमोर धिंगाणा केला. कपडे फाडून ते ढसाढसा रडले आणि जमिनीवर लोळले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

उमेदवारांच्या यादीमध्ये आपले नाव आलेच नाही हे ऐकून मदन शहा यांना धक्का बसला. त्यांनी थेट आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे १० सर्क्यूलर रोडवरील घर गाठले आणि त्याठिकामी राडा केला. लालू प्रसाद यादव यांच्या घराच्या गेटसमोर त्यांनी कपडे फाडले आणि जमिनीवर लोळू लागले. मदन शहा यांच्या रडतानाचा आणि राडा करतानाचा हा व्हिडीओ सध्या बिहारमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी मदन शहा यांनी माध्यमांशी संवाद साधताना आरजेडीवर गंभीर आरोप केले. 'आरजेडीमध्ये पैसे घेऊन तिकीट वाटले जात आहेत. पैसे देण्यास नकार दिल्यावर माझे तिकीट कापण्यात आले आणि संतोष कुशवाह यांना तिकीट देण्यात आले.', असा आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Sheera Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग आजचं घरी बनवा हॉटेल स्टाईल मूग डाळ शीर

Rapid Weight Gain: वजन झपाट्याने वाढत चाललंय; थांबा आताच व्हा सावध, होतील 'हे' गंभीर आजार

Nagpur Tourism : पक्षीप्रेमींसाठी नागपूरमधील बेस्ट लोकेशन, एकदा नक्की भेट द्या

Monday Horoscope: लक्ष्मीच्या कृपेमुळे पैशाची चणचण दूर होणार, दिवाळीत या राशींच्या व्यक्तींचे नशीब उजळणार

Monday Horoscope : दिवाळी चांगली जाईल, मनातील इच्छा पूर्ण होणार; 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT