Shocking: कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले, ABVP च्या ३ कार्यकर्त्यांना बेड्या

Madhya Pradesh Shocking Video: मध्य प्रदेशमधील एका महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे व्हिडीओ काढण्यात आले. या प्रकरणी एबीव्हीपच्या ३ जणांना अटक करण्यात आली.
Shocking: कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले, ABVP च्या ३ कार्यकर्त्यांना बेड्या
Madhya Pradesh Shocking VideoSaam tv
Published On

Summary -

  • मंदसौरच्या सरकारी महाविद्यालयात विद्यार्थिनींचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ लपून काढले गेले.

  • या प्रकरणी एबीव्हीपीच्या ४ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

  • तिघांना अटक करण्यात आली तर चौथा आरोपी फरार आहे

  • आरोपींचे मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे

मध्य प्रदेशच्या मंदसौरमधील एका सरकारी महाविद्यालयामध्ये भयंकर घटना घडली. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी तयारी करत असताना विद्यार्थिनींचे कपडे बदलत असलेले व्हिडीओ आणि फोटो काढण्यात आले होते. या प्रकरणाचे सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले असून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. हे तिघे जण विद्यार्थी असून ते एबीव्हीपीचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनींचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ काढल्याच्या आरोपाखाली एबीव्हीपीच्या ३ कार्यकर्त्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली. महाविद्यालयाच्या सांस्कृतीक कार्यक्रमासाठी तयार होणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढण्यात आले होते. या प्रकरणात अटक केलेले तिघेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेचे सदस्य असल्याचे पलिसांनी सांगितले. एका आरोपीने संघटनेचा शहर मंत्री असल्याचा दावा केला. हे सर्व आरोपी २० ते २२ वयोगटातील आहेत.

Shocking: कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले, ABVP च्या ३ कार्यकर्त्यांना बेड्या
Madhya Pradesh News: आईच्या डोळ्यांसमोर मुलींनी बापाला बेदम मारलं,कौटुंबिक वादाचा भीषण शेवट

पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील भानपुरा येथील सरकारी महाविद्यालयात मंगळवारी ही घटना घडली. प्रभारी मुख्याध्यापकांच्या लेखी तक्रारीवरून या प्रकरणात कारवाई करण्यात आली. मंदसौरचे पोलिस अधीक्षक विनोद मीणा यांनी पीटीआयला सांगितले की, महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी लेखी तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर कॅम्पसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी रेकॉर्ड केलेले फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये चार तरुण खिडकीतून डोकावताना स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली सर्व तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. चौथा आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Shocking: कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले, ABVP च्या ३ कार्यकर्त्यांना बेड्या
Madhya Pradesh : खदाणीत सापडला अमूल्य हिरा; हिऱ्याची किंमत ऐकून व्हाल थक्क, पाहा VIDEO

पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींचे मोबाइल ताब्यात घेण्यात आले आहेत आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी देण्यात आले आहेत. अभाविपचे जिल्हा समन्वयक चंद्रराज पवार यांनी पीटीआयला सांगितले की, या प्रकरणाची आम्हाला माहिती मिळाली. त्याची चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर आरोपी उमेश जोशीची शहर मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये अजय गौड आणि हिमांशू बैरागी यांचा देखील समावेश आहे.

Shocking: कॉलेजमध्ये कपडे बदलणाऱ्या विद्यार्थिनींचे गुपचूप व्हिडीओ काढले, ABVP च्या ३ कार्यकर्त्यांना बेड्या
Madhya Pradesh: मजुरीच्या पहिल्याच दिवशी लखपती; खाणीत सापडला तब्बल ४० लाखांचा हिरा | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com