Nitish Kumar Saamtv
देश विदेश

Bihar Election: 'इहाँ-उहाँ ना जाई'! बिहारमध्ये भाजप-जेदुयूचं ठरलं; पुढच्या निवडणुका भाजपसोबतच

Nitish Kumar: मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी एनडीएतील नेत्यांची बैठक झाली. गृहमंत्री अमित शहा शनिवारी बिहार दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात मोठी घोषणा केली.

Bharat Jadhav

महाराष्ट्रात विजय मिळवल्यानंतर भाजपने बिहार निवडणुकांसाठी तयारी सुरू केलीय. तेथील सत्तेत भागीदार असलेल्या जनता दल युनायटेडसोबत भाजपने विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केलीय. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा बिहारच्या दौऱ्यावर गेलेत.

रविवारी पाटणा येथील बापू सभागृहात आयोजित विविध योजनांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमाला अमित शहा यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख केला. त्याचवेळी त्यांनी आपल्याकडून दोनदा चूक झाली, आता पुन्हा ती होणार नाही, असं नितीश कुमार म्हणाले.

यावेळी बोलतांना नितीश कुमार म्हणाले, बिहारमध्ये खूप चांगले काम होत असल्याचा दावाही त्यांनी केला. आधी बिहारमध्ये गुंडराज होते, पण आमच्या सरकारने ते संपवून टाकलं. आज लोक रात्री उशिराही न घाबरता रस्त्यावर फिरू शकतात. कोसीसह अनेक प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणी झाली यावरून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. आम्ही 2005 रोजी सत्तेत आलो, पण त्यावेळी राज्याची स्थिती वाईट होती. सायंकाळनंतर कोणीही घराबाहेर पडत नव्हते. याआधीच्या सरकारांनी काहीही केले नव्हतं.

लोकांना फक्त हिंदू आणि मुस्लिमांच्या नावावर लढावलं जात होतं. राज्यात शिक्षणाच्या क्षेत्रात विस्तार नव्हता, लोकांवर योग्य उपचाराची व्यवस्था नव्हती. पण जेव्हापासून आमचं सरकार आलं, तेव्हापासून आम्ही संपूर्ण यंत्रणा सुरळीत करत आहोत. मी आधी दोनदा चूक केली, दुसरीकडे गेलो,स पण आता ते होणार नाही, असं नितीश कुमार अमित शहा यांच्या समोर म्हणालेत.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी NDA नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व घटक पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी NDA नेत्यांची बैठक झाली. यावेळी नितीश कुमार म्हणाले, बिहारमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढवण्यात येतील. अशी महत्वपूर्ण घोषणा भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: पवईत घराची भिंत कोसळली, १ जण गंभीर जखमी

Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला, कार डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली, ६ मित्रांचा मृत्यू

Jalna : स्वातंत्र्यदिनी आंदोलन करणाऱ्याच्या कमरेत पोलीस अधिकाऱ्याने घातली लाथ, व्हिडीओ व्हायरल

Chanakya Niti : लग्नानंतर प्रेम कमी होऊ नये म्हणून हा गुपित मंत्र

SCROLL FOR NEXT