PM Modi: आमच्यासाठी राष्ट्रहित सर्वात आधी; RSS बनला भारतातील अक्षय वटवृक्ष

PM Modi in Nagpur: पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांना नागपुरातील डॉ. हेडगेवार स्मारक मंदिरात आदरांजली वाहिली.
PM Modi
PM Modi in Nagpur:saam Tv
Published On

नागपूरमधील दीक्षाभूमीवर जाण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेडगेवार स्मृती मंदिरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार आणि सरसंघचालक गोळवलकर यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. आरएसएसची स्थापन होऊन आज शंभर वर्ष पूर्ण झालेत. याप्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं.

शंभर वर्षापूर्वी आरएसएसचं बीज पेरलं होतं. आता त्या बी चे वटवृक्ष झाले आहे. हे वटवृक्ष भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय चेतनेला जागृत करत आहे. राष्ट्र यज्ञाच्या या पवित्र विधीसाठी येथे येण्याचे आपल्याला सौभाग्य लाभले असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. आज चैत्र शुक्ल प्रतिपदेचा दिवस खूप खास आहे. आजपासून नवरात्रीचा पवित्र सण सुरू होत आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात गुढीपाडवा, उगादी सण साजरे केले जात आहेत

PM Modi
PM Narendra Modi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय संस्कृतीचा न मिटणारा अक्षय वट; नरेंद्र मोदींचे नागपुरात गौरवाद्गार, VIDEO

आज भगवान झुलेलाल जी आणि गुरू अंगद देव यांच्या अवतरणाचा दिवस आहे. याचवर्षी आरएसएसच्या गौरवशाली प्रवासाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्मृती मंदिरात जाऊन आदरणीय डॉ.साहेब आणि आदरणीय गुरुजींना आदरांजली वाहण्याचे भाग्य मला लाभले आहे, असंही मोदी म्हणाले.

PM Modi
Immigration and Foreigners Bill 2025: भारत देश काही धर्माशाळा नाही; लोकसभेत विधेयक मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट देत डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी मोदी म्हणाले, हे तेच ठिकाण आहे, जेथे आंबेडकरांनी १९५६ मध्ये त्यांच्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. स्मारकावरील अभ्यागतांच्या डायरीमध्ये लिहिलेल्या संदेशात मोदी म्हणाले, 'विकसित आणि सर्वसमावेशक भारत' निर्माण करणे हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल. 'नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाच 'पंचतीर्थ' पैकी एक असलेल्या दीक्षाभूमीला भेट देण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाबासाहेबांची सामाजिक समरसता, समता आणि न्यायाची तत्त्वे येथील पवित्र हवेत जाणवतात, असंही मोदी म्हणाले.

दीक्षाभूमी लोकांना समान अधिकार आणि गरीब, निराधारांना न्याय व्यवस्थेसह प्रगती करण्यास प्रोत्सहित करते. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, अमृत काळात आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांना आणि त्यांनी दिलेल्या विद्येचा मदतीने देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ. विकसित आणि सर्वसमावेशक भारताची निर्मिती हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com