CEC Gyanesh Kumar announces reforms for Bihar Election 2025 – only 1200 voters per booth, 100% webcasting. saam tv
देश विदेश

Bihar Election: मतदान प्रक्रियेत मोठा बदल; प्रत्येक बूथवर फक्त १२०० मतदार,मोबाईलच्या वापरास बंदी

Bihar Assembly Polls: पाटणा येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बिहार निवडणुकीत कोणत्याही बूथवर १२०० पेक्षा जास्त मतदार राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Bharat Jadhav

  • बिहार निवडणुकीत प्रत्येक बूथवर केवळ १२०० मतदारांचीच नोंद असेल.

  • मतदान प्रक्रियेत १००% वेबकास्टिंग होणार आहे.

  • बिहारमध्ये एकूण २४३ विधानसभा मतदारसंघ आहेत.

मतदान प्रक्रियेत निवडणुक आयोगाने मोठा बदल केलाय. बिहार निवडणूक प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदान प्रक्रियेतील बदलाची माहिती दिली. निवडणूक आयोगाची टीम दोन दिवसांपासून बिहारमध्ये आहे. सर्व निवडणूक प्रक्रियेची तयारी कशा पद्धतीने करण्यात आलीय, याचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली. (Bihar Election 2025 reforms: Only 1200 voters per booth announced by Election Commission)

कोणत्याही बूथवर १,२००पेक्षा जास्त मतदार नसणार आहेत. १००% वेबकास्टिंग असेल. बिहारमध्ये २४३ विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपतोय. त्यापूर्वी निवडणुका होतील, अशी माहिती ज्ञानेश कुमार यांनी दिली. दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, निवडणूक आयोगाने पहिल्या दिवशी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर सर्व जिल्ह्यांचे जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, डीआयजी आणि पोलीस निरीक्षकांसोबत निवडणूक आयुक्तांनी बैठका घेतल्या.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तीन सत्रांमध्ये अंमलबजावणी संस्थांचे नोडल अधिकारी, बिहारचे मुख्य सचिव, डीजीपी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका झाल्या. सीईसो यांनी सांगितलं की, पहिल्यांदा बूथ लेवल एजंट्सची प्रशिक्षण दिल्लीमध्ये झालंय. बूथ लेवल ऑफिसरसाठी फोटो आयडी कार्ड उपलब्ध करून देण्यात येतील. मतदान केंद्राबाहेर त्यांना मोबाईल फोन ठेवावा लागेल. ही सुविधा सर्व ९०,००० मतदान केंद्रांवर उपलब्ध असेल. मतदारांना देण्यात येणाऱ्या मतदार स्लिपमध्ये बूथ क्रमांक ठळक अक्षरात असेल, ज्यामुळे बूथ शोधणे सोपे होणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या एसआयआर अंतर्गत अपात्र मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. पण अजूनही वेळ आहे, जर ते पात्र असतील तर ते नामांकन समाप्त होण्याच्या १० दिवस आधीपर्यंत फॉर्म-६ किंवा फॉर्म-७ भरून सादर करू शकतात, असे आवाहनही निवडणूक आयुक्तांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं

Christmas Celebration : ख्रिसमस सेलिब्रेशन करायचे असेल तर, मुंबईतील माउंट मेरी चर्चला नक्कीच भेट द्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT