Bihar Election News  Saam tv
देश विदेश

Bihar Election : इंडिया आघाडीत पहिली मोठी ठिणगी पडली; आरजेडी आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने

Bihar Election Update : इंडिया आघाडीत पहिली मोठी ठिणगी पडल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत आरजेडी आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने आले आहेत.

Vishal Gangurde

आरजेडीने १४३ उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेसच्या उमेदवारांविरोधातही उमेदवार जाहीर

१२ मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि आरजेडीचे उमेदवार आमनेसामने

सुलतानगंजमध्ये ललन यादव (काँग्रेस) आणि चंदन सिन्हा (आरजेडी) यांच्यात थेट लढत होणार

बिहार निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे.बिहारमध्ये सोमवारी दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आजच आरजेडीने १४३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारीवरूनच इंडिया आघाडीत ठिणगी पडल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत आरजेडी आणि काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने उतरले आहेत.

बिहारमध्ये काही जागांवर काँग्रेस आणि आरजेडीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. सुल्तानगंज विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राजदने उमेदवार जाहीर केले आहेत. बिहारच्या सुल्तानगंज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने ललन यादव यांना उमेदवार जाहीर केली होती. त्याच मतदारसंघातून आता राजदने चंदन सिन्हा यांना मैदानात उतरवलं आहे. बिहारमध्ये १२ मतदारसंघात दोन्ही पक्षाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

बिहारमधील निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६ नोव्हेंबर रोजी १२१ विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यासाठी आजचा दिवस होता. रविवारी रात्रीपर्यंत एकूण १३७५ अर्ज स्वीकारण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल हा १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.

आज उमेदवारांची यादी जाहीर करताना राष्ट्रीय जनता दलाने म्हटलं की, 'सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. सर्वांना विजयासाठी शुभेच्छा'.

एकीकडे जागावाटपावरून इंडिया ठिणगी पडल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे एनडीएमध्ये जागावाटपावर तोडगा निघालेला दिसत आहे. इंडिया आघाडीत काही जागांवरून वाद उफाळला आहे. तर काही जागांवर तोडगा निघालाय. या निवडणुकीत संघटनात्मक पातळीवर एनडीएने आघाडी घेतल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ; दोन बड्या सरकारी अधिकाऱ्यांचं निलंबन

Govardhan Asrani Dies: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचा जगाला अलविदा, मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: झेंडूच्या फुलांना मिळाला अवघा 5 ते 10 रुपये प्रतिकिलो दर

Asrani Death: प्रसिद्ध विनोदी अभिनेते असरानी यांचे निधन, वयाच्या ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Officers Promotion : राज्यात सनदी अधिकाऱ्यांना दिवाळी भेट; नरक चतुर्दशीच्या दिवशी कुणाची कुठे बढती झाली? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT