Prem Birhade : लंडनच्या प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट; पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाने केला मोठा खुलासा

Prem Birhade News : लंडनच्या प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय. पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाने या प्रकरणी महत्वाची माहिती दिलीये.
Prem Birhade
Prem Birhade news updateSaam tv
Published On
Summary

पुण्यातील मॉडर्न कॉलेजमुळे लंडनमध्ये नोकरी गेल्याचा आरोप प्रेम बिऱ्हाडेने केला होता

प्रेमची नोकरी गेल्याचा दावा चुकीचा असल्याचं कॉलेजने स्पष्ट केलंय.

मॉडर्न कॉलेजने जातीय भेदभावाच्या आरोपांनाही फेटाळून लावलेत

कॉलेजच्या बदनामीसाठी मुद्दाम मोहिम रचल्याचा कॉलेज प्रशासनाचा आरोप

अक्षय बडवे, साम टीव्ही

लंडनच्या प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पुण्यातील मॉर्डनमध्ये कॉलेजने शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याने लंडनमधील नोकरी गमावावी लागल्याचा दावा तरुणाने केला होता. त्यानंतर पुण्यातील मॉर्डनमध्ये कॉलेजच्या आवारात अनेक संघटनांनी आंदोलन केलं होतं. आता या प्रकरणात मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापकाने मोठा खुलासा केला आहे.

Prem Birhade
Gajanan Vada Pav Dombivli : चाललंय काय? प्रसिद्ध वडपावच्या दुकानात चटणीत आढळल्या अळ्या; ग्राहकांचा संताप

मॉडर्न कॉलेजचे प्राध्यापक श्यामकांत देशमुख यांनी प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात खुलासा करताना म्हटलं की, 'प्रेम बिऱ्हाडे याची नोकरी गेलेला नाही. काल रात्री आम्हाला कंपनीचा मेल आला आहे. आम्ही त्या विद्यार्थ्यांची सगळी माहिती पाठवली आहे. चुकीची दिशाभूल केली जात आहे. आम्ही विद्यार्थ्याला जात विचारली नाही.

'आमचं काल त्या विद्यार्थ्याशी बोलणं झालं आहे. आम्हाला कंपनीचे तीन मेल आले होते. पण त्यांनी अॅविएशन अॅक्टचा उल्लेख केल्याने माहिती गोळा करायला उशीर लागला. त्यांनी आम्हाला पाच वर्षांचं रेकॉर्ड विचारलं, तो विद्यार्थी आमच्याकडे तीन वर्ष होतं. विद्यार्थ्याला कोणी जात विचारली नाही, जर कोणी त्यात आमचा कर्मचारी दोषी आढळला तर आम्ही कारवाई करू, असे ते म्हणाले.

Prem Birhade
Bihar Politics : महाठग, NDAची हवा, ५ किंगमेकर नेते; महाराष्ट्राचे CM फडणवीस बिहारमध्ये प्रचाराला, सांगितलं बेरजेचं राजकारण

कॉलेजने प्रेम बिऱ्हाडे प्रकरणात कॉलेजने सर्व आरोप फेटाळले आहेत. कॉलेजने विद्यार्थ्याला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. या मॉडर्न कॉलेजने १४ ऑक्टोबरला प्रमाणपत्र दिल्याचे जाहीर केलं. कॉलेजच्या बदनामीसाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप प्रेमवर करण्यात आला आहे. प्रेमची कृती बदनामी, सायबर छळ आणि समाजाला भडकावणे या अंतर्गत येतात.

Prem Birhade
Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

प्रेमने व्हिडिओमध्ये काय म्हटलं?

प्रेम म्हणाला, "जय भीम सगळ्यांना. मी माझ्या कंपनीच्या बाहेर उभा आहे. माझ्या हातात आयडी कार्ड असून ते कंपनीत परत करायला निघालोय. कारण माझी नोकरी गेलीये. पुण्याच्या एका कॉलेजमुळे नोकरी गेलीये. माझ्या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं. मी त्यांचा विद्यार्थी होतो का? त्यावेळी कॉलेजने सांगितलं नाही. कॉलेजने माझ्या विद्यापीठाच्या अर्जाच्या वेळी दोनदा शिफारपत्र दिलं होतं. या वेळेस त्यांनी काहीच सांगितलं नाही? कारण त्यांना आम्ही पुढे गेलेलो नकोय. फक्त हे आयडी कार्ड किंवा नोकरी नाही. हे माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या शिक्षकांचं, माझ्या समाजाचा कित्येक वर्षांचा संघर्ष होता."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com