Gajanan Vada Pav Dombivli : चाललंय काय? प्रसिद्ध वडपावच्या दुकानात चटणीत आढळल्या अळ्या; ग्राहकांचा संताप

Gajanan Vada Pav Dombivli News : डोंबिवलीत प्रसिद्ध वडपावच्या दुकानात चटणीत अळ्या आढळल्याची घटना घडली. या घटनेनंतर ग्राहकांनी एकच संताप व्यक्त केला.
Gajanan Vada Pav news
Gajanan Vada PavSaam tv
Published On
Summary

डोंबिवली पश्चिममध्ये गजानन वडापावच्या चटणीत आढळल्या अळ्या

ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर उमटल्या संतापजनक प्रतिक्रिया

समाजसेविकेने पालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणली

मनपाने तात्काळ दुकान बंद करून तपासणी सुरू केलीये.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

Dombivli : खवय्यांच्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या डोंबिवली पश्चिम भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आलाय. येथील प्रसिद्ध ‘गजानन वडापाव’ विक्रेत्याच्या चटणीत चक्क अळ्या आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

​डोंबिवली पश्चिमेकडील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक भाजी विक्रेत्या महिलांनी या प्रसिद्ध दुकानातून वडापाव खरेदी केला. वडापाव खाताना त्यामधील चटणी नीट पाहिली. त्यावेळी त्यांना त्यात हालचाल करणाऱ्या अळ्या दिसल्या.

Gajanan Vada Pav news
Pune Crime : आधी कोयता दाखवून तरुणांनी नंगानाच केला, पोलिसांनी तासाभरात उतरवला सर्वांचा माज; गावभर काढली धिंड

दुकानातील हा प्रकार पाहून भाजी विक्रेत्या महिला ग्राहकांनी तात्काळ हा वडापाव टाकून देत दुकानात गोंधळ घातला. या संतापजनक घटनेची माहिती परिसरात दिली. यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या समाजसेविका काशीबाई जाधव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. त्यांनी तातडीने ही बाब कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे 'ह' प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली.

Gajanan Vada Pav news
Railway Station Update : मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्टेशनचं नामांतर; नावात काय केला बदल? जाणून घ्या

राजेश सावंत यांनीही कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता तात्काळ या स्थळाची पाहणी केली. पाहणीत प्रकार सत्य असल्याचे लक्षात आले. त्यांनी आरोग्य विभागाला सूचित करून संबंधित 'गजानन वडापाव'चे दुकान त्वरित बंद करण्याचे आदेश दिले. सध्या अन्या आणि आरोग्य विभाकडून संबंधित खाद्याचे नमुने नेत तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी नंतर योग्य करवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सागितले.

A

कुठे हा प्रकार घडला?

A

डोंबिवली पश्चिमेकडील प्रसिद्ध गजानन वडापावच्या दुकानात हा प्रकार घडला आहे.

Q

ग्राहकांचा संताप का झाला?

A

वडापावच्या चटणीत अळ्या आढळल्याने ग्राहकांनी संताप केला.

Q

पालिका प्रशासनाने काय कारवाई केली?

A

पालिका अधिकाऱ्यांनी दुकान तात्काळ बंद करून अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com