Bihar Police News  Saam TV
देश विदेश

Crime News : दारू विक्रेत्यांकडून पोलिस कॉन्स्टेबलची हत्या; मन सुन्न करणारी घटना, आरोपी फरार

दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस काँस्टेबलची हत्या करण्यात आली आहे.

Satish Daud

Bihar Crime News : देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. अशातच बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका पोलीस काँस्टेबलची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी साक्रा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

बिहारच्या मुझफ्फरपूरच्या साक्रा पोलीस स्टेशन हद्दीतील दर्धा गावात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दीपक निर्गम (वय ३२) असं हत्या झालेल्या पोलीस (Police) कर्मचाऱ्याचं नाव आहे. दीपक हे साक्रा पोलीस ठाण्यात कर्तव्यास होते.

सोमवारी रात्री त्यांच्या पथकाला दर्धा गावातील गंडक नदीकाठावरील घरात अवैध्य दारू विक्री सुरू असल्याची मिळाली होती. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठून दारूविक्रेत्यांना घेरले. यावेळी दारूविक्रेत्यांनी पोलिसांवर हल्ला (Crime News) चढवला. यावेळी दोन आरोपींनी दीपक यांच्यासह एका पोलीस कर्मचाऱ्याला नदीत खेचत मारहाण केली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दीपक यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, दीपक यांच्या इतर साथीदारांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळानंतर दीपक यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. दीपक यांच्यासोबत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले की, आम्ही ड्युटीवर नव्हतो, त्यानंतरही आम्हाला ड्युटीवर पाठवण्यात आले.

छापा मारण्यासाठी आम्ही नदीच्या काठावर पोहोचलो तेव्हा दूरवर दिवे जळताना दिसत होते. जवळ गेल्यावर दोन दारू माफियांशी भांडण झाले आणि त्यानंतर दोघांनी दिव्याला नदीत बुडवले. इतर साथीदार पोहोचले तोपर्यंत मृतदेह पाण्याखाली गेला होता, रात्री 2 ते 3 च्या सुमारास मृतदेह आढळून आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: पैसा आणि नवी संधी, 'या' 4 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट, वाचा रविवारच राशिभविष्य

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT