Malad Police Station
Malad Police StationSaam Tv

Crime News : चोरीसाठी विमानाने यायचे; दिल्लीतच्या चोरांचा मुंबईत धुमाकूळ

मालाड पोलिसांनी टोळीतील तिघांना केली अटक, दोन फरार

संजय गडदे

Latest Crime News : मुंबईत दिवसाढवळ्या घरफोडया करून राजधानी एक्सप्रेसने परराज्यात पलायन करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करण्यात मुंबईच्या मालाड पोलिसांना यश मिळाले आहे. दिल्लीत १०० हून अधिक गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या आणि तीस वर्षाहून अधिक काळ दिल्लीत धुमाकूळ घालणाऱ्या या टोळीला मुंबई मालाड पोलीसांनी मात्र पहिल्याच प्रयत्नात अटक केली आहे.

Malad Police Station
Sanjay Raut News : संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर डॉक्टर संतप्त, उद्धव ठाकरेंनी केली मध्यस्थी

हे चोर मुंबईत चोरी करण्यासाठी विमानाने आले होते चोरी करून यातील दोन चोर पुन्हा विमानाने गेले मात्र मुद्देमाल घेऊन जाणाऱ्या तीन चोरांना मालाड पोलिसांनी मध्य प्रदेश रतलाम येथून अटक करून 1.87 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पोलीस (Malad Police ) ठाणे हद्दीत लिबर्टी गार्डन येथील एका तीन मजली इमारतीमध्ये दिवसाढवळ्या एका बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख रुपये, लॅपटॉप तसेच सोन्या चांदीचे दागीने अशी एकूण रुपये १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचा मालमत्ता अज्ञात इसमांनी चोरून नेला.

याबाबत 11 जानेवारी रोजी फिर्यादीने मालाड पोलीस ठाण्यास तक्रार दिली होती या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर मालाड पोलिसांनी (Police) तपासासाठी पथके तयार करून तपासात सुरुवात केली.

ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी कसलाही पुरावा न ठेवल्याने आणि परिसरात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने चोरांची माहिती मिळवणे कठीण झाले होते. मात्र गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरी झालेल्या परिसरातील खाजगी व सरकारी असे मिळून एकूण ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली.

Malad Police Station
Satyajeet Tambe : सत्यजीत तांबे काँग्रेस सोडणार? ट्विटर बायोतून पक्षाचं नाव हटवलं, सोशल मीडियावर 'त्या' पोस्टची चर्चा

संशयित आरोपी कुर्ला परिसरातील एका लॉजवर थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, त्या अगोदरच तिथून निघून गेल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकाने मुंबई सेंट्रल टर्मिनस येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला.

मात्र चोर तेथेही आढळून आले नाहीत. प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी राजधानी एक्सप्रेस गाडीने निघून गेल्याचे समजले यानंतर मालाड पोलिसांनी एक्सप्रेसमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या रेल्वे कर्मचान्यांशी संपर्क साधून त्यांना आरोपींचे छायाचित्र पुरवून तीन आरोपींना रतलाम, मध्यप्रदेश येथे रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा बल यांच्या मदतीने ताब्यात घेतले.

मालाड पोलीस ठाण्याचे पथकाने तीन आरोपींना रतलाम येथे पोहचून ताब्यात घेतले. अटक आरोपीकडे चौकशी केल्यावर त्यांच्या दोन साथीदारांनी हवाईमार्गे पलायन केल्याचे त्यांनी सांगीतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com