Dance Video : लग्नाच्या वरातीत बेभान होऊन नाचली महिला; भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

एका महिलेचा लग्नाच्या वरातीत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Women Dance Video
Women Dance VideoInstagram

Women Dance Viral Video : सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे लग्नाच्या वरातील डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशाच एका महिलेचा लग्नाच्या वरातीत डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. (Latest Marathi News)

Women Dance Video
Crime News : दिल्लीतील चोरांचा मुंबईतील बंद घरांवर डोळा; आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

या व्हिडीओत एक महिला लाल रंगाची साडी नेसून लग्नाच्या वरातीत भन्नाट डान्स (Dance Video) करताना दिसून येत आहे. डीजेच्या तालावर या महिलेला थिरकताना पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ nepaltiktok नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो लोकांनी बघितलं आहे. व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडीओत या महिलेसोबत इतर महिलाही दिसत आहेत.

अगदी काही सेकंदाच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या इंस्टाग्राम रीलला 2.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि 71 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, सर्व युजर्सनी प्रतिक्रिया देताना या महिलेचं कौतुक केलं आहे. एका यूजर्सने लिहले आहे की, याला म्हणतात स्वतःमध्ये आनंदी राहणे. तर दुसर्‍याने लिहिलं आयुष्यही असंच जगायला हवं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com