Bihar Crime Saam Tv
देश विदेश

Crime: मंदिरामध्ये गोळ्या झाडून व्यापाऱ्याची हत्या, भावालाही सोडलं नाही; गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला

Bihar Crime: बिहारमध्ये एका व्यापाऱ्याची मंदिरामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या व्यापाऱ्याच्या भावावर देखील गोळीबार करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे पाटणा हादरले.

Priya More

Summary -

  • पाटण्यात व्यापाऱ्याची निर्घृण हत्या

  • मंदिरामध्ये गोळ्या झाडून व्यापाऱ्याला संपवण्यात आले

  • व्यापाऱ्याच्या भावावरही गोळीबार करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला

  • तीन हल्लेखोरांनी पाठलाग करत व्यापाऱ्याला संपवलं

बिहारची राजधानी पाटणामध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. बुधवारी रात्री पाटणामध्ये एका व्यापाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी व्यापाऱ्याच्या भावाला देखील सोडले नाही त्याच्यावर देखील गोळ्या झाडण्यात आल्या. तीन हल्लेखोरांनी पळवून पळवून व्यापाऱ्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याच्या भावावर देखील गोळीबार केला. पाठीमध्ये गोळी घुसल्यामुळे व्यापाऱ्याचा भाऊ जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाटणा शहरातील सुल्तानगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मुसल्लहपूर हाटमध्ये ही हत्याकांडाची घटना घडली. सोनू आणि आकाश हे दोघे भाऊ असून ते कांद्याचे व्यापारी आहेत. दोघेही आपल्या दुकानात बसले होते. त्याचवेळी २ ते ३ मारेकरी त्यांच्या दुकानात आले आणि त्यांनी सर्वात आधी सोनू कुमारला लक्ष्य करत त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सोनू आणि त्याचा भाऊ आकाश दुकानातून पळाले. आरोपींनी दोघांचा पाठलाग केला आणि मंदिरामध्ये सोनूवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात सोनूचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर आरोपींनी सोनूचा भाऊ आकाशचा पाठलाग करत त्याच्यावर देखील गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आकाशच्या पाठीत गोळी घुसली असून तो गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर सर्व आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी झालेल्या सोनू आणि आकाशला स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी सोनूला मृत घोषीत केले. तर आकाशवर उपचार सुरू आहेत.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिस घटनास्थळावरून पुरावे गोळा करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं तयार करण्यात आली आहेत. आरोपींची ओळख पटली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पूर्ववैमनस्यातून ही हत्याकांडाची घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. एका क्षुल्लक कारणावरून व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पाटणा हादरले आहे.c

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT