Bihar Crime Saam tv
देश विदेश

Crime: लग्नात रक्तरंजित थरार! आवडतं गाणं न वाजवल्यानं वऱ्हाडी संतापले, नवरदेवाच्या काकाची चाकूने वार करत हत्या

Bihar Crime: बिहारमध्ये लग्नसमारंभात हत्याकांडाची घटना घडली. नवरदेवाच्या काकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. लग्नामध्ये गाणी वाजवण्यावरून त्यांचा स्थानिक तरुणांसोबत वाद झाला होता. या वादानंतर त्यांची हत्या करण्यात आली.

Priya More

Summary -

  • बिहारच्या सिवानमध्ये लग्नसमारंभात हत्याकांड

  • नवरदेवाच्या काकाची हत्या करण्यात आली

  • स्थानिक तरुणांनी गाणी लावण्याच्या वादातून केली हत्या

  • आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शोध घेतला जात आहे

बिहारमध्ये लग्नसमारंभामध्ये एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. आवडतं गाणं न वाजवल्यामुळे झालेल्या वादातून नवरदेवाच्या काकाची चाकून भोसकून हत्या करण्यात आली. बिहारच्या सिवान जिल्ह्यातील नागई गावात ही घटना घडली. ही घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी संतप्त नागरिकांनी रस्तारोको केला आणि आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीष कुमार साह अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव होते. ते सिवान जिल्ह्यातील रघुनाथपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीपूर गावातील रहिवासी होते. नंदलाल साह यांचा मुलगा सुशील कुमार याचे लग्न होते. त्याचे लग्न रितुन साह यांच्या मुलीसोबत ठरले होते. लग्नासाठी त्याची वरात लक्ष्मीपूर देवपूरहून नागई गावात आली होती. सुशीलचे काका हे देखील वरातीत सहभागी झाले होते.

रात्री १२ वाजता वरातीमध्ये गाणी वाजवण्यावरून सुशीलच्या काकाचा स्थानिक तरुणांशी वाद झाला. त्यावेळी नागरिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. तरुण निघून गेले. पहाटे दीड वाजता जेव्हा मनीष वऱ्हाडी मंडळींना गाडीतून गावी परत नेत होते. तेव्हा आरोपी तरुणांनी त्यांना एकटे पाहून चाकूने सपासप वार केले.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीष यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी शुक्रवारी सकाळी चैनपूर बाजारातील आंबेडकर चौकामध्ये रास्तारोको केला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन; 9 तासांनंतर तरुण टॉवरवरून खाली

Team Tukaram Mundhe: प्रीती झिंटाचा तुकाराम मुंढेंना पाठिंबा; अभिनेत्रीच्या टी-शर्टची सोशल मीडियावर रंगली चर्चा

Ganesh Chaturthi 2026 : 14 सप्टेंबरला दोन सण एकाच दिवशी! उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या योग्य वेळ

Satara Crime: तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राचार्याविरोधात पोलिसांची मोठी कारवाई

गणरायासाठी सोन्याच्या दागिन्यांचे 5 सुंदर डिझाईन्स, जे पाहून तुम्हालाही आवडतील

SCROLL FOR NEXT