Physical assault by Occultist Saam Tv News
देश विदेश

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

Physical assault by Occultist: भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली एका गर्भवती महिलेवर मांत्रिकाकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ही संताजनक घटना बिहारमधील मुझफ्फरपूरमधील शिवाईपट्टी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.

Bhagyashree Kamble

भूतबाधा दूर करण्याच्या नावाखाली एका गर्भवती महिलेवर मांत्रिकाकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ही संताजनक घटना बिहारमधील मुझफ्फरपूरमधील शिवाईपट्टी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. या घटनेनंतर पीडित महिलेची तब्येत बिघडली. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा हे प्रकरण समोर आलं. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, या प्रकरणी कारवाई आणि चौकशी सुरू आहे.

बिहारमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच मुझफ्फरमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. काही दिवसांपासून महिलेला त्रास जाणवू लागला होता. गर्भवती महिलेवर भुतबाधा झाली असावी असा संशय व्यक्त करत सासरच्या मंडळींनी पीडितेला एका मांत्रिकाकडे नेलं. शिवाईपट्टी पोलीस स्टेशन परिसरातील मधेरा गावातील मांत्रिकाचं घर होतं. सासरच्या मंडळींना मांत्रिकाने घराबाहेर बसवलं. तर, महिलेला खोलीत नेलं.

भुधबाधा दूर करण्यासाठी महिलेला खोलीत नेत असल्याचं सांगत मांत्रिकाने पीडितेवर बलात्कार केला. यानंतर महिलेनं याबाबत कुणालाही सांगितलं नाही. मांत्रिकाने याच गोष्टीचा फायदा घेतला असून, पुन्हा महिलेला बोलावून घेतलं. दुसऱ्यांदाही महिलेवर बलात्कार केला. तिसऱ्यांदा महिलेला बोलावून घेत आणखी दोन मांत्रिकाने महिलेचं लैंगिक शोषण केलं.

महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर पीडितेला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. तेव्हा माहेरच्यांना पीडितेवर मांत्रिकाकडून अतिप्रसंग झाल्याचं समोर आलं. महिलेच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस प्रभारी सरवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून, पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी आणि कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT