Politics: मनसे अन् शिवसेना युतीवर खासदाराचं सूचक विधान; विजयी मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?

Shiv Sena and MNS: त्रिभाषा धोरण मागे घेतल्यानंतर शिवसेना आणि मनसे ५ जुलै रोजी मराठी विजय दिन साजरा करणार. उद्धव व राज ठाकरे एकत्र मंचावर, संजय राऊत यांनी दिली माहिती.
raj thackeray uddhav thackeray
raj thackeray uddhav thackerayx
Published On

महायुती सरकारने त्रिभाषा धोरण लागू करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर, शिवसेना आणि मनसेने ५ जुलै रोजी विजयी सोहळा साजरा करण्याची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगितली. तसेच, भविष्यात अशा प्रकारचं धोरण सरकार स्वीकारणार नाही, असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.

'या कार्यक्रमाला जे कुणी येतील, त्या प्रत्येकाचे आम्ही सन्मानाने स्वागत करू. कारण ही लढाई एकट्याची नव्हती, प्रत्येकाने त्यात योगदान दिले आहे', असंही संजय राऊत म्हणाले.

मराठी माणसासाठी आनंदी दिवस

'उद्या महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या ऐतिहासिक आणि मराठी माणसाच्या जीवनातला आनंदी दिवस आहे. मराठी विजय दिन तर आहेच सोबत महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात नवे बदल घडवणारा दिवस आहे. उद्या वरळीतील सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र उपस्थित राहतील. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक यायला निघाले आहेत. संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत आहेत. आज आम्ही सगळे तिकडे जाणार आहोत', असं संजय राऊत म्हणाले.

raj thackeray uddhav thackeray
बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

विजयी मेळाव्याबाबत संजय राऊत म्हणाले, 'उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून जल्लोषात कार्यक्रमाला सुरूवात होईल. हा एक ऐतिहासिक कार्यक्रम असेल. खूप दिवसानंतर एक भाषा म्हणून, एक संस्कृती म्हणून, मराठी भाषेला विजयाचा दिवस पाहता आला आहे. हे सगळं मराठी माणसाच्या एकजुटीमुळे आणि ही एकजूट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमुळे शक्य झाली आहे', असं राऊत म्हणाले.

raj thackeray uddhav thackeray
कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

मराठी भाषेला विजय मिळवून देण्याबाबत राऊत म्हणाले, 'हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एकत्र आंदोलन केलं. आंदोलन करत त्यांनी मराठी भाषेला विजय मिळवून दिला. अर्थात आपण सगळे उद्या पाहाल, काय ठरलं आहे आणि काय ठरवलं आहे. हे आता सांगण्यापेक्षा उद्या तुम्ही पाहा', असं म्हणत त्यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला.

कार्यक्रमाची रूपरेषा

कार्यक्रमाची रूपरेषाबाबत संजय राऊत म्हणाले, 'सर्व कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे करतील. त्यांच्याकडेच कार्यक्रमाची रूपरेषा आहे. उद्या तुम्हाला सगळं कळेल. जे येतील त्या सगळ्यांचे स्वागत आहे. मग ते काँग्रेसचे नेते, राष्ट्रीय काँग्रेसचे किंवा डावे पक्ष असतील, प्रत्येकाचा आम्ही सन्मानाने स्वागत करू. लढाईत प्रत्येकाचं योगदान आहे, आम्ही मान्य करू', असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com