कार मंदिरात घुसली; ५-६ जणांना चिरडलं, दोघांचा मृत्यू, पायऱ्यांवर रक्ताच्या थारोळ्या | Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar Kal Ganpati temple: छत्रपती संभाजीनगरच्या काळा गणपती मंदिरासमोर घडलेल्या अपघातानंतरची दृश्यं, रक्ताचे थारोळे आणि घटनास्थळी गर्दी.
HORRIFIC ACCIDENT IN CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
HORRIFIC ACCIDENT IN CHHATRAPATI SAMBHAJINAGARSaam tv news
Published On

छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. शहरातील सिडको भागात असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर एक भीषण अपघात घडला. मंदिरासमोर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुसाट कारने उडवले. जवळपास ५ ते ६ जणांना चिरडल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको भागांत असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर एक भयानक अपघात घडला. काही भाविक मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिराच्या दिशेनं जात होते. मात्र, एका कारचा नियंत्रण सुटला आणि भरधाव कार थेट मंदिराच्या पायऱ्यांवर चढली. या भीषण अपघातात जवळपास ५ ते ६ जणांना चिरडले गेल्याची माहिती आहे.

HORRIFIC ACCIDENT IN CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
बीडमध्ये राडा! कोयता, लोखंडी रॉड अन् दगडानं ४ जणांना ठेचलं; रस्त्यावर रक्तच.. कारण फक्त | Beed Crime

त्यापैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मंदिराच्या पायऱ्याजवळ रक्ताचे थारोळे साचल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

HORRIFIC ACCIDENT IN CHHATRAPATI SAMBHAJINAGAR
Pune: दोघांनी ७ जणांना लुटलं अन् गळ्यावर कोयता ठेवून मुलीचं शोषण; पंढरीच्या वारीत नेमकं काय घडलं? आरोपीचं रेखाचित्र समोर

या भीषण अपघाताच्या घटनेनंतर कारचालक फरार झाला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस फरार कारचालकाचा शोध घेत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com