Pune: दोघांनी ७ जणांना लुटलं अन् गळ्यावर कोयता ठेवून मुलीचं शोषण; पंढरीच्या वारीत नेमकं काय घडलं? आरोपीचं रेखाचित्र समोर

Shock in Pune Daund: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे भाविकांवर झालेल्या लूटपाटीत अल्पवयीन मुलीवर कोयत्याचा धाक दाखवत अत्याचार केला. आरोपीचा रेखाचित्र पोलिसांनी जारी केला आहे.
DAUND POLICE RELEASE SUSPECT SKETCH IN SWAMI CHINCHOLI ROBBERY AND ASSAULT CASE
DAUND POLICE RELEASE SUSPECT SKETCH IN SWAMI CHINCHOLI ROBBERY AND ASSAULT CASESaam tv news
Published On

देवदर्शनासाठी निघालेल्या ३ ते ४ कुटुंबातील सात भाविकांना २ अज्ञात व्यक्तींनी मिळून लुटलं. तसेच कोयत्याचा धाक दाखवत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचे तयार रेखाचित्र आता समोर आले आहे.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीत एक भंयकर प्रकार घडला. तीन ते चार कुटुंब देवदर्शनासाठी निघाले होते. सध्या आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक पंढरपूरची वाट धरतात. सात भाविक स्वामी चिंचोली येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. यादरम्यान, २ अज्ञात आरोपी दुचाकीवरून आले आणि त्यांना लुटले.

DAUND POLICE RELEASE SUSPECT SKETCH IN SWAMI CHINCHOLI ROBBERY AND ASSAULT CASE
BNP Leader: ३५ हजारांचं कर्ज फेडलं नाही; महिलेला आधी विवस्त्र केलं, नंतर बलात्कार, नेत्याचं महिलेसोबत भयंकर कृत्य

भाविकांच्या गळ्याला कोयता लावून त्यांनी त्यांच्याकडील महागडे ऐवज लुटले. नंतर एका अल्पवयीन मुलीला कोयत्याचा दाखवत तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा कसून शोध सुरू आहे.

DAUND POLICE RELEASE SUSPECT SKETCH IN SWAMI CHINCHOLI ROBBERY AND ASSAULT CASE
Mankhurd: झोपत नाही म्हणून बाप संतापला; लेकीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, नराधमाने अत्याचाराची मर्यांदा ओलांडली

दरम्यान, फरार एका आरोपीचा रेखाचित्र रेखाटण्यात आले आहे. आरोपीचे रेखाचित्र पुणे ग्रामीण पोलिसांनी जारी केले आहे. पोलिसांनी रेखाचित्र जारी करत, रेखाचित्रातील व्यक्तीबाबत कुणालाही माहिती असल्यास पोलिसांना देण्यात यावी. तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com