Manasvi Choudhary
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अनेक उत्पादनांचा वापर केला जातो. फेस रोलर देखील त्वचेला मऊ, मुलायम आणि चमकदार ठेवते.
फेस रोलर केल्यामुळे त्वचा तरूण, टवटवीत राहण्यास मदत होते.
फेस रोलर केल्यामुळे चेहऱ्यावरची सूज कमी होण्यास मदत होते. चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते.
रोलरने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण वाढते. यामुळे त्वचेला जास्त ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात, परिणामी त्वचा अधिक टवटवीत आणि गुलाबी दिसते.
नियमित मसाज केल्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो, ज्यामुळे त्वचा सैल पडत नाही आणि घट्ट होते
रोलर नेहमी खालून वरच्या बाजूला आणि आतल्या बाजूकडून बाहेरच्या बाजूला फिरवा. कधीही रोलर खाली ओढू नका.