Manasvi Choudhary
छत्रपती शिवाजी महाराज... हे नाव जरी उच्चारलं तरी मनात एक वेगळाच उत्साह आणि उर्जा येते.
छत्रपती शिवाजी महाराजांची किर्तीच सर्वदूर पसरली आहे. कारण महाराजांचे पराक्रम इतके अद्वितीय की, त्यांचा जीवनकाळ कायमच सर्वांसाठी प्रेरणा देत राहिला. त्याचबरोबर महाराजांनी त्याचं आरोग्य देखील जपलं.
याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाविषयी या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार काय होता? ते दररोजच्या जेवणात कोणते पदार्थ खायचे? त्यांचा सर्वात आवडता पदार्थ कोणता? असे प्रश्न अनेकांना आहेत.
याविषयी अनेक अभ्यासकांनी संशोधन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहाराविषयी माहिती सांगितली आहे.
महाराजांच्या आहारामध्ये संतुलित आणि पौष्टिक पदार्थ होते. ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, दूध, लोणी दही तूप या पदार्थाचा समावेश होता.
मोहिमेवर जात असताना छत्रपती शिवाजी महाराज केळी बरोबर न्यायचे. पिठलं - भाकरी हा त्यांचा अत्यंत आवडता पदार्थ मानला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.