ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
किचन आणि बाथरूममधील एक्झॉस्ट फॅन नियमितपणे स्वच्छ न केल्यास, त्यात ग्रीस आणि धूळ जमा होऊ शकते, ज्यामुळे हवा दूषित होते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
सर्वातआधी, एक्झॉस्ट फॅनचे शटर आणि इतर सहज काढता येणारे भाग काढून घ्या. संपूर्ण मोटर काढण्याची गरज नाही.
कापसाच्या गोळ्याचा वापर करुन, पंखांना आणि कडांना नारळाचे तेल लावून घ्या. यामुळे घाण आणि ग्रीस जमा होणार नाही. सफाई करणे देखील सोपे होईल.
पंखांना तेल लावल्यानंतर ३० मिनिटे तसेच ठेवून द्या. जेणेकरुन घाण स्वच्छ निघण्यास मदत होईल.
थोडे कोमट पाणी करुन घ्या ते पाणी एका टपात ओता आणि त्यात काढलेले इतर भाग ५ मिनिटे भिजत ठेवा.
पाण्यात भिजवल्यानंतर फॅनचे इतर भाग हळूवारपणे ब्रशने घासून घ्या. घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.
सर्व भाग सुकवून घ्या आणि परत त्यात लावा. तुमचा एक्झॉस्ट फॅन जास्त प्रयत्न न करता स्वच्छ आणि नवीनसारखा दिसेल.