ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फ्रिज हि प्रत्येकाच्या घरातील महत्त्वाची वस्तू आहे. सर्वजण फ्रिजमध्ये अनेक पदार्थ साठवून ठेवत असतात. पण त्यात सतत अन्न साठवून डाग पडतात आणि फ्रिज खराब दिसू लागतो. यासाठी प्रत्येक आठवड्याला फ्रिज स्वच्छ कसा करावा ते जाणून घ्या.
सर्वात आधी कापड ओले करा आणि फ्रिज पुसून घ्या. यामुळे फ्रिजमध्ये साचलेली घाण निघून जाईल.
बेकिंग सोडा पावडरचे आणि पाण्याचे मिश्रण बनवून घ्या. त्यात लिंबाचा रस टाका आणि फ्रिजला आतून हे मिश्रण लावून घ्या.
हे मिश्रण फ्रिजमध्ये १० मिनिटे ठेवा. नंतर कापड स्वच्छ पाण्याने ओला करुन घ्या आणि फ्रिजच्या आतून स्वच्छ पुसून काढा.
पाण्यात व्हिनेगर मिक्स करुन मिश्रण तयार करुन घ्या. तयार केलेले मिश्रण फ्रिजमध्ये लावा. ते १५ मिनिटे तसेच राहू द्या.
नंतर, स्वच्छ पाण्यात भिजवलेल्या कापडाने किंवा रुमालाने ते पुसून टाका. यामुळे सर्व घाण आणि पिवळेपणा निघून जाईल.
जर पिवळेपणा तीव्र असेल तर टूथपेस्ट कापडावर लावा आणि त्या पिवळ्या भागावर घासून घ्या. नंतर, ५ मिनिटांनी स्वच्छ धुवा.