ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक जण घरगुती कामांसाठी आणि कपडे कापण्यासाठी कैचीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
कैचीचा वारंवार वापर होत असल्यामुळे धार कमी होण्यास सुरुवात होते. धार कमी झाल्यास कैचीने कोणतीही वस्तू नीट कापता येत नाही.
कैचीची धार गेल्यास ती दगडावर घासल्याने कैची धारदार बनवता येते.
काचेच्या बरणीच्या साहाय्याने पण तुम्ही कैची धारदार करु शकता.
काचेच्या बरणीचे झाकण काढा आणि जिथे बरणीचे तोंड आहे तिथे कैची फिरवा. काचेवर कैची घासल्याने ती तीक्ष्ण होते.
कैची धारदार करण्यासाठी तुम्ही मीठाचा वापर करु शकता.
एका ग्लासमध्ये मीठ भरा. तुमची कैंची त्या ग्लासमध्ये टाका आणि उघड बंद करा. असे २ मिनिटे केल्याने कैचीची धार वाढेल.