ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एअर फ्रायरचा दररोज वापर केल्याने त्यात घाण आणि तेल जमा होण्याची शक्यता जास्त असते.
सफाई करण्याच्या आधी एअर फ्रायरला ठंड होऊन द्या आणि अनप्लग करा.
एअर फ्रायरचा बास्केट आणि पॅन काढून घ्या. नंतर ते कोमट साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
एअर फ्रायरवर ओरखडे पडू नये म्हणून नरम स्पंजचा वापर करुन आतील भाग हलक्या हाताने स्वच्छ करुन घ्या.
हिटिंग एलिमेंटच्या खाली जमा झालेले अन्नाचे कण काळजीपूर्वक काढून टाका.
बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवून मिक्स करा आणि पडलेल्या हट्टी डागांवर पेस्ट लावून स्वच्छ करा.
एअर फ्रायर पुसण्यासाठी मऊ कापड किंवा सुती टॉव्हेल वापरा.
ओल्या कापडाने पुसून बाहेरील भाग चमकदार आणि धूळमुक्त ठेवा. नियमित साफसफाई केल्याने एअर फ्रायर नवीनसारखे दिसू शकते.