ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोक दूध हे नेहमी उकळवून ठेवत असतात. दूध जर उकळवून घेतले नाही तर, ते फाट्याची शक्यता असते.
अनेक जण दूध हे स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये उकळवतात. या भांड्यांमध्ये दूध नीट उकळवता येते.
काही वेळा लोक दूध उकळवायला ठेवतात आणि बाकीचे काम करतात आणि अशातच दूध ओतू जाऊन दूधाचे भांडे जळून काळे पडते.
जर तुमच्या घरातील दुधाचे भांडे जळून काळे पडले असेल तर ते साफ करण्यासाठी काही सोप्या टिप्सचा वापर करा.
जळलेल्या भांड्यात पाणी टाका आणि साबणाचे पाणी सुध्दा टाका. नंतर एका कापडाने ते पुसून घ्या.
जळलेल्या भांड्यात गरम पाणी भरा. त्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाकून ५ मिनिटे तसेच ठेवून द्या. असे केल्याने भांड्याचा काळपटपणा निघण्यास मदत होईल.
लिंबू हे जळलेल्या भागांना स्चच्छ करण्यास मदत करतो. भांड्यात लिंबाचा रस आणि व्हिनेगर टाका. थोडावेळाने जळलेला भाग चमच्याने खरवडून काढा.
जळलेल्या काळपट भांड्यात गरम पाणी उकळवून घ्या. नंतर त्यात मीठ आणि लिंबाचा रस टाका. ३० मिनिटे तसेच राहून द्या मग भांडे स्वच्छ करुन घ्या.
जळलेल्या दुधाच्या भांड्याला स्वच्छ करण्यासाठी, धातूचा स्क्रबर किंवा लाल डिशवॉशर वापरा. यामुळे सर्व काळेपणा निघून जाईल.