ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक घरात तांदूळ हा वर्षभर साठवून ठेवला जातो. तांदूळ जास्त काळ साठवला की त्यात किडे होण्याची शक्यता असते. योग्य पध्दतीने तांदूळ साठवल्यास तांदूळ वर्षभर सुरक्षित राहू शकतो.
तांदूळ 3 ते 4 तास कडक उन्हात पसरवून ठेवा. यामुळे किडे हळू हळू कमी होण्यास मदत होते. उन्हात वाळवलेला तांदूळ जास्त काळ टिकतो.
उन्हातून आणलेला तांदूळ गरम असतो. तो थेट डब्यात भरू नये. पूर्ण थंड झाल्यावरच टाकीत किंवा डब्यात भरावा.
तांदूळ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा.हवा शिरली तर किडे होण्याची शक्यता वाढते. वर्षभर साठवून ठेवायचे असेल तर मोठ्या पत्र्याच्या टाकित किंवा तुमच्या जवळ उपलब्ध असलेल्या कोणत्याही टाकीत तुम्ही तांदूळ ठेवू शकता.
तांदळाच्या टाकित किंवा डब्यात 5 ते 6 सुकलेली कडुनिंबाची पाने ठेवा.सोबतच 2 ते 3 तमालपत्र घाला. यांचा वास किड्यांना दूर ठेवतो.
डब्यात 4 ते 5 लवंगा आणि काळी मिरी ठेवा. लवंगा आणि काळी मिरी जर उपलब्ध नसेल तर २ ते ३ न सोललेल्या लसूण पाकळ्या ठेवाव्या. ही नैसर्गिक पद्धत आहे.
तांदूळ साफ करताना थोडी बोरिक पावडर मिसळा. बोरिक पावडर तांदळाला लावल्यास किडे होत नाही. पण तांदूळ वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यावा.
मोठ्या प्रमाणात तांदूळाची साठवण करायची असेल तर, एकाच डब्यात न ठेवता वेगळ्या डब्यांत तांदूळ साठवावा. दर महिन्याला तांदूळ चेक करत जा.