ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आडा डोसा ही झटपट बनणारी डिश आहे जी गव्हाच्या पिठापासून बनवली जाते.
गव्हाचे पीठ, दही, पाणी, मीठ, जीरे, हिरवी मिरची कोथिंबीर आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
गव्हाचे पीठाला चाळून घ्या. नंतर दह्यासोबत मिक्स करुन मीठ आणि पाणी टाकून त्याचे मिश्रण बनवून घ्या.
तयार केलेल्या मिश्रणात जीरे, बारिक कापलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्स करुन काही वेळासाठी तसेच ठेवून द्या.
तवा गरम करुन घ्या. त्यावर थोडे तेल टाका आणि तयार केलेल्या मिश्रणाला तव्यावर पसरवून डोसा बनवा.
डोस्याला दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या. तयार झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या.
तयार केलेल्या गव्हा डोसाला नारळाची चटणी किंवा सांभरसोबत सर्व्ह करा आणि खाण्याचा आनंद घ्या.
गव्हाच्यी पिठापासून बनवलेल्या डोस्यात भरपूर फायबर असते आणि हा डोसा पचायला हि हलका मानला जातो.